माजी आमदार आनंदराव गेडाम यांची मागणी
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत तर गैर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याकरिता शासकीय हमी भावाचे धान खरेदी केंद्र मंजूर केले आहे. परंतु प्रत्येक्षात अजूनही धानाची खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व साधारण प्रतीचा धान बाहेरच्या मार्केट मध्ये हमी भावा पेक्षा कमी किमतीने विकावे लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुस्कान होत आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुस्कान टाळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ धानाचे खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.