आरमोरी-मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांची विशेष सभेची नोटीस क्रमांक दिनांक 14 -2- 2023 अन्वये नगर परिषदेचे विशेष सभा दिनांक २३.०२.२०२३ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशानुसार दुपारी ठीक ३.०० वाजता आरमोरी नगरपरिषदेच्या स्थायी सभापती पदाची निवडणूक आरमोरी न. प.च्या सभागृहात घेण्यात आली.या सभेत एकूण १६ सदस्य उपस्थित होते.झालेल्या निवडणुकीत चारही जुनेच स्थायी सभापतींची निवडणूक घेण्यात येऊन झालेल्या निवडणुकीत जुनेच सभापती पुन्हा एकदा विराजमान झाले.
झालेल्या निवडणुकीत बांधकाम सभापती म्हणून सागर मने, पाणीपुरवठा सभापती म्हणून विलास पारधी,आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून भारत बावनथडे,महिला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार यांचे सभापतिपद जैसे थे ठेवण्यात आले.
आरमोरी न.प.ची निवडणूक झाल्यापासून मागील ४ वर्षांपासून हे चारही सभापती अद्यापही कायम आहेत.झालेल्या स्थायी सभापतींच्या निवडणुकीत हे चारही सभापती कायम असल्याने सभापतींनी आपले प्रमुख नेते व मार्गदर्शक प्रकाश सावकार पोरेड्डीवार व आ.कृष्णा गजबे यांचे आभार मानले. भाजपचे जेष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या कुशल नेतृत्वामुळे चारही सभापती जैसे थे त्याच पदावर कायम आहेत.
सदर निवडणुकीत पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे तर सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून आरमोरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डाँ.माधुरी सलामे यांनी काम पाहिले.
आरमोरी नगरपरिषदेच्या सभापती पदी चारही सभापती जैसे थे विराजमान झाल्याबद्दल नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, नगरसेवक मिथुन मडावी,नगरसेविका गीता सेलोकर,प्रगती नारनवरे, सुनीता चांदेवार, श्रीहरी कोपुलवार, पंकज खरवडे, नंदू पेट्टेवार,नंदू नाकतोडे,मनोज मने, दीपक निंबेकर,शुभम निंबेकर, युगल सामृतवार,अक्षय हेमके,गोविंदा भोयर,टिंकू बोडे, श्रेयस सोमनकर,जितेंद्र ठाकरे, कुणाल पिलारे,राहुल तीतीरमारे, थामेश्वर मैंद,रोहित धकाते,प्रसाद साळवे, डाँ.संगीता रेवतकर, मीनाक्षी गेडाम यांनी आभार मानले.