गडचिरोली जिल्ह्याचे न भरून निघणारे नुकसान. धनंजय वायभासे, भा. व. से. यांची बदली

आरमोरी… भारतीय वनसेवेतील कर्तव्यदक्ष व धडाडीने काम करणारे अधिकारी म्हणुन नावारूपास आलेले वडसा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक धंनजय वायभासे (आय.एफ.एस.) यांची नुकतीच यवतमाळ येथील वनविभागात उपवसंरक्षक या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलिने एक कर्तबगार अधिकारी गेल्याचे दुःख वन कर्मचारी व नागरिक बोलून दाखवत आहेत.

गडचिरोली हा वनाचा जिल्हा म्हणुन सबंध महाराष्ट्रात ओळखला जातो. त्यामुळे या जिल्हयात वनविभागात काम करण्यास मोठा वाव आहे. आय.एफ.एस.असलेले धनंजय वायभासे हे वडसा वनविभागात सहाय्यक वनसंरक्षक म्हणुन वर्षभरापूर्वी रुजू झाल्याबरोबर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अनेक चांगले निर्णय घेत काम केले होते. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व जनता यांच्यातील दुवा म्हणुन काम केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वनविभागाच्या कामाची गती वाढविली. वडसा येथील वन विभागाच्या परिसरात उदयास आलेली वनकोठडी त्यांच्याच प्रयत्नातून तयार झाली. वनगुन्हेगरीवर आळा बसावा म्हणुन त्यांनी प्रयत्न तर केलेच शिवाय वन गुन्हेगाराच्या, रेती चोरांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक वन जमिनीवरील अतिक्रमण स्वतः लक्ष देउन हटविले. वन्यप्राण्याची शिकार करुण चामडे, नखे व अवयव विक्री करणाऱ्या टोळ्याचा बंदोबस्त केला. तसेच वनगुन्हेगारावर अंकुश निर्माण केला.
वन कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासोबतच त्यांच्यात सुधारणा घडुन आणली. स्वतः टीम लीडर म्हणुन अनेक धोके पत्करून ते पुढे होत होते. क्षेत्रीय स्तरावर काम करतांना वन कर्मचाऱ्यांना मानसिक, भावनीक, समस्या, कामाचा व्याप व त्यामुळे वाढणारा ताण यापासून तणावमुक्त जिवन जगण्यासाठी तणावमुक्ती वर कार्यशाळा घेतली. तसेच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यात सकारात्मक दृष्टीकोन रुजविण्याचे काम त्यांनी केले..

वडसा वनविभागातील आरमोरी, वडसा, पोर्ला वनपरिक्षेत्रातील अनेक गावांत मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला होता. वाघाच्या हल्यात अनेक शेतकऱ्याचा बळी गेला. तेव्हा लोकांचा रोष वनविभाच्या अधिकाऱ्यावर वाढला होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी लोक मोर्चा निवेदने देत होते तेव्हा सुध्दा वायभासे यांनी दोन दिवसात वाघाला जेरबंद करण्याचें आश्र्वासन देत त्यांनी चोवीस तासातच लक्ष केंद्रित करून वाघाला जेरबंद करण्याची मोहीम आखली व आश्वासनानंतर अवघ्या २४ तासातच वाघाला जेरबंद करुण आश्वासन पुर्ण केले .

वडसा वनविभागात जंगली हत्तीच्या कळपाने धुडगूस घातला होता. पिकांचे नुकसान केले होते अशावेळी त्यांनी आतापर्यंत भारतात कधीही न वापरलेली लेटेस्ट टेक्नॉंलॉजी वापरून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हत्तीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले व पश्चिम बंगाल वरुन हुल्ला पार्टीला बोलावून आपल्या वन कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षित केल्याने वडसा वनविभागात जंगली हत्तींमुळे होणारे मोठे नुकसान टाळता आले.

आपल्या काम करण्याच्या पद्धतीने वन कर्मचारी व लोकांमध्ये आपली अमीप छाप त्यांनी उमटविली आहे. वनविभागाच्या कामाची गतीही त्यांनी वाढविली होती त्यामूळे एक धडाडीने काम करणारा वनअधिकारि म्हणुन अल्पावधीतच नावारूपास आले होते मात्र त्यांची यवतमाळ येथे उपवनसंरक्षक म्हणुन बदली झाल्याचे दुख अनेक वन कर्मचारी व नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. साहेबांनी पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात काम करण्यासाठी यावे असा सूर सर्वच स्तरातून व्यक्त केला जात आहे.