गडचिरोली,(जिमाका)दि.29: गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात आले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत माहे मार्च -2023 करिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहे.
अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 30 किलो तांदुळ मोफत, गहू 5 मोफत, तर 1 किलो साखर २० रुपये प्रति किलो प्रमाणे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती 4 किलो तांदुळ मोफत, 1 किलो मोफत, शिधाजिन्न संच प्रतिसंच रुपये 100/- प्रमाणे,
शासन पत्र संदर्भ क्र.2 अन्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रु.3 रु, प्रतिकिलो तांदूळ-/2, प्रतिकिलो गहू व रु -/ 1 प्रतिकिलो भरडधान्य या दराने अन्नधान्य वितरीत -/करण्यात येणारे ‘ अन्नधान्यदिनांक 01 जानेवारी 2023 ते दिनांक 31.12 पर्यत एक वर्षाच्या 2023 कालावधीकरीता अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे आहे. मोफत, नियतनाचा महिना कोणताही असला तरीही सदर अन्नधान्य दि.01.01.2023 पासून मोफत वितरीत करण्याबाबतचे शासन निर्देश प्राप्त आहे.
तसेच शासन पत्र संदर्भ क्र.3 अन्वये जिल्हयातील रास्तभाव दुकानामार्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्य ‘’आनंदाचा शिधा ‘’ प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नस संचाचे माहे मार्च, 2023 या महिन्याकरीता ई-पास प्रणालीद्वारे रु. 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.
सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येत की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे मार्च, 2023 महिन्यातील नियमित देय असलेल्या गहू व तांदूळ अन्नधान्याची मोफत उचल करावी. व धान्य घेतेवेळी पोओएस मशीन मधून निघणारी पावतीवर रास्तभाव दुकानादाराकडून घ्यावी व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त आनंदाचा शिधा रु. 100/- प्रतिसंचची उचल करावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.