चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचे सोबत समस्यांवर चर्चा निवेदन सादर

गडचिरोली:
आज दिनांक २४/०४/२०२३ ला सकाळी ११:३० वा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्या सोबत गडचिरोली प्रकल्प अधिकारी मैनक घोष (IAS)याच्या दालनात बैठक पार पडली या बैठकीत १) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे १०,२०,३० नुसार वरीष्ठ वेतनश्रेणी मंजुर करणे २) अनुदानित आश्रमशाळेतील वर्ग ४कर्मचा-यांकरीता बंद असलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन तात्काळ करणे ३) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तकेच दुय्यम प्रत देण्याबाबत ४)वेतन दरमहिण्याच्या ५तारखेपर्यत देण्याबाबत इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली,यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव श्री.पी.जी.गायकवाड यांनी प्रकल्प अधिकारी मैनक घोष यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.या चर्चेवेळी प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) अनिल सोमनकर उपस्थित होते,तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री.रत्नाकर मडावी चिमुर प्रकल्पाचे अध्यक्ष श्री.अनिल तलमले, गडचिरोली प्रकल्पाचे अध्यक्ष श्री.जितेंद्र दोडके, सचिव तेजस घुटके म्हशाखेत्री हरीश पत्रे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच प्रकल्प कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थिती होते,
यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी मैनक घोष यांनी दिले.