सैनिक समाज पार्टी गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुकीच्या रिंगणात. 

 

 

👉 तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक मिळणार न्याय.

 

 

सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कनऀल बलबीर सिंह परमार यांच्या मौलिक विचार आणि मार्गदर्शनाने प्रेरित होऊन,

समाजकार्यात पारंगत असलेले तसेच राजकारणाचे अभ्यासक, पत्रकारिता करित असतांना निर्भीडपणे वृत्त लेखन करणारे ,जनकल्याणासाठी तत्परतेने धावुन जाणारे चक्रधर मेश्राम यांनी नव्याने सैनिक समाज पार्टीच्या व्यासपिठावर सामिल होण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अनेक वर्षांपासून समाजसेवा करित असल्याने जनमानसात त्यांनी लोकप्रियता मिळविली आहे. सैनिक समाज पार्टीचे माध्यमातून ध्येय- धोरण , विकास योजना, संविधानिक मुलभूत हक्क आणि अधिकार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी , समाजातील सुशिक्षित, ईमानदार देशभक्त टॅलेंटेड नागरीकांचे नेतृत्व करण्यासाठी सतत प्रयत्न केले जाणार आहेत.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रस्तापीत घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी रितसर आखणी करून निवडणुकीत पाय रोवून आणि विजयी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व निवडणुकीत उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने कंबर कसली जाणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सैनिक समाज पार्टीने यशस्वी झेप घेतलेली आहे. महाराष्ट्रातील करोडो जनता सैनिक समाज पार्टीच्या Ideology ला जोडली गेलेली आहे.

बेहिशेबी मालमत्ता धारकांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सैनिक समाज पार्टी तर्फे बौद्धिक आंदोलन सुरू करुन निवडणूकीच्या रिंगणात उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.

सैनिक समाज पार्टीच्या कार्यातून गावपातळीवर विकासाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून आणि आढावा बैठक घेऊन संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात संघटन कौशल्य निर्माण करण्यात येणार आहे.

सैनिक समाज पार्टीत महाराष्ट्रातील आजी – माजी सैनिकांनी तसेच प्रत्येक घरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केले आहे. राजकारणात अराजकता माजविणाऱ्या, गुंडगिरी प्रवृत्तीच्या, भ्रष्टाचारी, वंशवादी प्रवृत्तीच्या उमेदवारांना त्यांची खरी जागा दाखवून दिली पाहिजे हे बळ आता फक्त सैनिक समाज पार्टीतमध्ये आहे.

संघटनेच्या माध्यमातून अडाणी अल्पशिक्षित गुंडप्रवृतीच्या, भुमाफिया, दारू माफिया, दुध माफिया, प्रस्तापीत घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना हरविण्याचा पराक्रम फक्त सैनिक समाज पार्टी करणार आहे. त्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, शहर प्रत्येक जिल्हा, भ्रष्टाचार मुक्त, वंशवाद मुक्त, गुंडगिरी मुक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेंनी सैनिक समाज पार्टीत सामील होण्याची गरज आहे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केले आहे.