अर्धा पावसाळा उलटूनही ग्रा.प.कासवीने उपसल्या नाहीत नाल्या…!

 

 

..……….म्हणाले ग्रा.प.कासवीचे सरपंच उपसण्यासाठी काहीतरी करावे लागेल?

 

आरमोरी:-

ग्रा.प.कासवीचे घर टॅक्स 80% वसुली होऊनही अर्धा पावसाळा संपला तरी नाली उपसा झालेला नाही. यावरून ग्रा.प.कासवी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.अशी नागरिकांच्या गप्पा दिसतात.

ग्रा.प.कासवीची 80% वसुली झाल्यावरही आरोग्यासाठी खर्च करीत नसेल तर कुठंतरी दुसऱ्या नाल्या उपसत तर नाही ना? अश्याप्रकारे संशय येत आहे.ग्रा.प.कासवीचे सरपंच सतीश गुरनुले यांच्या सोबत संपर्क केला असता नाली उपसा करण्याबाबत विचारले असता त्यांनी अजूनही नाली उपस्यासंदर्भात कोणतीही निविदा काढलेली नाही व वसुलीतून कोणतीही तरतूद केलेली नाही असे त्यांच्या बोलण्यावरून दिसते त्याच बरोबर वार्ड 3 रामपूर येथील घनश्याम डोरलीकर यांच्या घराजवळील नालीवरील कलवट 1 वर्षापासून दोन खड्डे पडलेले आहेत तरी त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसतात.सरपंच यांना विचारले असता नियोजनात नाव दिलेले आहे असे सांगितले मात्र त्यांचे वार्ड 3 कडे दुर्लक्ष करतांना दिसत आहेत.

ग्रा.प.कासवी येथील ग्रामसेवक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

ग्रा.प.कासवी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असेल तर त्यांना वसुली करण्याचा कोणताही अधिकार नाही अश्या प्रकारे नागरिक गप्पा करतांना दिसतात.