राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार गजबेंनी केली मागणी
मुंबई:
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे अतिदुर्गम,अतिसंवेदनशील भागात वसलेले आहेत.माञ त्या गावातील नागरिकांना अद्यापही आवश्यक त्या प्रमाणात शासकीय स्तरावरुन दिल्या जाणाऱ्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे केली.
यात प्रामुख्याने आरमोरी विधानसभा क्षेञातील नविन ग्रामपंचायती ऑनलाईन प्रक्रियेध्ये अद्यापही समाविष्ट करण्यात आल्या नसल्याने पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल असतील की अजुन इतरही समस्या मार्गी लागु शकल्या नाहीत.शहरी विभागात घरकुलासाठी अडिच लाख रुपये अनुदान देण्यात येत असुन घरकुलाचा खर्च ग्रामीण भागातही सारखाच असताना,उलट ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुलासाठी लागणारे साहित्य शहरी भागातुनच खरेदी करावे लागत असल्याने वाहतुकीचा खर्च जास्त येत असताना माञ दिड लाख रुपये देण्यात येत आहेत.यात वाढ करून शहरी भागाच्या धर्तीवर ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनाही अडिच लाख रुपये अनुदान देण्याची मागणी केली.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा व आरमोरी पंचायत समितीचे नविन इमारत बांधकामाचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत.हे प्रस्ताव मंजूर करून नविन इमारत बांधकामासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा.ग्रामपंचायती अंतग॔त कार्यरत असलेले ग्रामरोजगार सेवक व डाटा ऑपरेटर यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. ग्रामीण भागातील पांदन रस्ते तयार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा.दोन तीन वर्षांपासून राशन कार्ड काढलेले आहेत, परंतु त्यांना अद्यापही राशन मिळत नाही कारण इष्टांक कमी असल्याचे सबब पुढे करण्यात येत असल्याने केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करून लाभार्थ्यांना सुरळीत राशन पुरवठा करण्यात यावा.
मागील दोन वर्षापुर्वी कुरखेडा तालुक्यातील पुराडा व आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथील आरोग्य विभागाच्या उपकेंद्रांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्या संदर्भात प्रस्ताव सादर केला होता,पैकी पुराडा उपकेंद्राला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळाला असला तरी देऊळगाव येथील उपकेंद्राला अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळाला नाही तो यथाशिघ्र देण्यात यावा.उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सोय नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात येते.दरम्यान योग्य उपचार मिळणे दुरापास्त होत असल्याने अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्या सोबतच जीव गमवावे लागते.ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतग॔त येत असलेल्या आरमोरी व कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ सिटीस्कॅनची व्यवस्था करून देण्यात यावी.उपरोक्त मागण्या संदर्भात संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याने घरकुल संदर्भात ग्रामविकास मंत्री,राशन संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंञी तसेच आरोग्य विभागाच्या समस्यांबाबत आरोग्य मंञ्यांनी आपल्या स्तरावरुन जातीने समस्या यथाशिघ्र मार्गी लावण्याची मागणी आमदार गजबे यांनी केली.