दोन गावातीलv५८ लाभार्थ्यानाबदक पिल्लु गटाचे वाटप
वनव्यवस्थापन समितींचा पुढाकार :-
आरमोरी…. खाकी कॅम्पबेल ही बदक सुधारीत जातीच्या कोंबडी पेक्षा अधिक फायदेशीर आहे.वर्षाला २९० अंडी उत्पादन करतात. अंडयांचे वजन ७५ ते ८० ग्रॅम एवढे असते. बदकांची वाढ सुदधा कोंबडीपेक्षा लवकर होते.सदर जातीचे बदके हि ४ ते ५ महिण्यातच अंडी देण्यास सुरुवात करीत असते. रोगराई सुद्धा कमी लागते. त्यामुळे कॉबडीच्या तुलनेत बदक पालणाचा खर्च कमी असल्याने बदक फायदेशीर असते असे प्रतीपादन गडचिरोली वनवृत्ताचे वनसरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले..
डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक मा. डॉ. किशोर मानकर, वडसाचे उपवनसंरक्षक धर्मविर सालविठठल यांचे मार्गदर्शनाखाली पोर्ला वन परिक्षेत्रातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती नवरगांव येथील २२ लाभार्थी व चुरचुरा येथील ३६ लाभार्थ्याना बदक पिल्लांचे वितरण वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर व उपवनसंरक्षक धर्मवीर साल विठ्ठल यांचे हस्ते करण्यात आले.
हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलालगतच्या गावांत डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजना राबविण्यात येत आहे. लोकांचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी व शेतीला पुरक व्यवसाय म्हणून बदक पालन करुन त्यातून आर्थीक विकास साधण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने नवरगांव व चुरचुरा या गावातील अनुक्रमे २२ व ३६ लाभाथ्र्यांना प्रत्येकी १० बदक पिल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, , नवरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुनंदा दशमुखे संयुक्त वनव्यवस्थापन समिती, नवरगांवच्या अध्यक्षा भारती अनिल सहारे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती चुरचुरा चे अध्यक्ष मनोज म्हशाखेत्री, क्षेत्र सहाय्यक चुरचुरा, क्षेत्र सहाय्यक, पोर्ला तसेच वनरक्षक चुरचुरा, वनरक्षक नवरगांव तसेच गावातील नागरीक व वनकर्मचारी उपस्थित होते.