देसाईगंज:-
गडचिरोली जिल्ह्यात तलाठी संवर्गातील होत असलेल्या भरती प्रक्रियेत बिगर आदिवासी उमेदवारांवर होत असलेला अन्याय दुर व्हावा यासाठी राज्यपाल महोदयांनी लक्ष देऊन होत असलेल्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या सुचना संबंधितांना द्याव्यात अशा मागणीचे निवेदन तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे यांच्या नेतृत्त्वात मा. राज्यपाल महोदयांना उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्या मार्फतीने पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
युकांने निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश भाग हा पैसा मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पदभरतीसंदर्भात अनेक गैरआदिवासी लोकांनी आक्षेप नोंदविला आहे. पेसा कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी मागील काही वर्षापासून सुरू आहे. अशातच त्यानुषंगाने दि. २९ ऑगस्ट २०१९ ला राज्यपालांनी पेसा क्षेत्रात गैरआदिवासींची संख्या असलेल्या गावातील नागरिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी नव्याने अधिसुचना काढली. त्या अधिसुचनेनुसार राज्य शासनाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन शासन निर्णय काढून संबंधित पेखातील १७ पदांसाठी बिंदुनामावली जाहीर केली. यानुसारच पुढील पदभरती होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील गैरआदिवासींना होती. मात्र शासनाने जुन्याच अधिसुचनेनुसार तलाठी व वनरक्षक पदाची जाहीरात काढल्याने अनेकांनी आश्चर्य झटका बसला. जिल्ह्यात पदभरती होत असून सुद्धा बिगर आदिवासी उमेदवार पासून वंचित राहणार असल्याने यामुळे बिगर आदिवासी उमेदवारांत नाराजीचा सुरू असल्याने हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.
जिल्ह्यात पेसा क्षेत्रात तलाठी पदाच्या भरतीप्रमाणे वनरक्षक गट (क) पदाच्या भारतीमध्येही ओबीसी उमेदवारांसाठी एकही पद राखीव नसल्याने महसुल व वन विभागाच्या दि. २८ जुन २०२३ रोजी प्रकाशित जाहीरातवरून स्पष्ट होते. पेसा क्षेत्रांतील वनरक्षकाच्या १५१ जागांपैकी सर्व जागा राखीव असल्याने जिल्ह्यातील ओबींसीसह सर्व बिगर आदिवासी समाजातील उमेदवारांत असंतोष निर्माण झाल्याने दिसून येत आहे. दि. २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसारच जिल्ह्यातील तलाठी व वनरक्षक पदाची भर्ती करण्यास संबंधितांना सुचना द्यावात जेणे करून ईतर बिगर आदिवासी उमेदवारांवर अन्याय होणार नाही यामुळे ओबीसी समाजात चुकीचा मॅसेज सुद्धा जाणार नाही. अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा तालुका युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी निवेदन देतांना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष आरती लहरी, आदिवासी काँग्रेस तालुकाध्यक्षा जयमाला पेंदाम, सेवादल शहर अध्यक्ष भिमराव नगराळे, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र गजपुरे, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय करांकर, माजी न.प. उपाध्यक्ष निलोफर शेख, महासचिव विलास बन्सोड, सेवादल सचिव गिरिधर कामथे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष देवणाथ सयाम, अमर भर्रे, महासचिव अमर बगमारे, कोषाध्यक्ष विनोद चंडीकार, सोशल मीडिया प्रमुख अरविंद दुपारे, शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, सरचिटणीस ओमकार कामथे, रजनी आत्राम, विमल मेश्राम, समीता नंदेश्वर, सचिन वधारे, चेतन मेंढे, सतीश कन्नाके, तेजराम नेवारे, रामकृष्ण क्षीरसागर, चंद्रकांत भर्रे, विशाल मेंढे, राजकुमार मेश्राम, विलास लोखंडे, सह बहुसंख्य युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.