मणिपुर येथील महिलांना विवस्त्र करून नग्न करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा – बौध्द समाज कोअर कमिटीची मागणी

 

देसाईगंज-

मणिपुर राज्यात हिंसक कारवायाने राज्यातील जनता होरपळून निघत आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसताना नुकतेच येथील कुकी आदिवासी महिलांची नग्न धिंड काढुन माणुसकीला काळिमा फासण्यात आले आहे. या घटनेचा देसाईगंज येथील बौध्द कोअर कमिटी च्या नेतृत्त्वात अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी समर्थन देऊन तीव्र निदर्शने केली.

मणिपूर महिलाओ के सम्मान मैं देसाईगंज मैंदान मैं, जय भीम घोषणा देऊन देसाईगंज शहर दणाणून गेले. स्थानिक फवारा चौकातून रॅली दुपारी 12.30 वाजता कोअर कमिटी व विविध सामाजिक संघटना, पक्षाचे पदाधिकारी, महिलांनी रॅलीत सहभाग घेतला. अनेक तरुण एकत्रित आले. केंद्र सरकार तसेच मणिपूर राज्य सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर फवारा चौकातून ते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय पर्यंत लाँग मार्च काढण्यात आले.

यावेळी शहर व परिसरातील मिळून हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून देसाईगंज वासियांना एकतेचा संदेश दिला. तसेच देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांना निवेदन पाठविण्यात आले.

मणिपुर राज्य हा देशाचा अविभाज्य घटक असुन राज्यात

मागील तीन महिन्यांपासून हे सत्र सातत्याने सुरु असतानाच येथील महिलांची नग्न धिंड काढुन त्यांच्या इज्जतिचे अक्षरश: धिंडवटे काढण्यात आले आहेत. यावरून मणिपुर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन भारता सारख्या लोकशाही अस्तित्वात असलेल्या देशात अशा घटना देशाला काळिमा फासणाऱ्या आहेत.

दरम्यान येथील कायदा व सुव्यवस्था राज्य सरकारच्या आवाक्याबाहेर झाले आहे.

जातीवादी शक्तींनी गोरगरीब आदिवासींवर सर्रास अन्याय, अत्याचार करणे सुरु केले आहेत. ही अतिशय निंदनीय बाब असुन कुकी आदिवासी महिलांची नग्न धिंड काढुन अमानविय छेड करणे निंदनीय आहे. त्यामुळे या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्या नराधमाना कायद्यातील कठोरात कठोर दंडात्मक कार्यवाही करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधी स्विकारले. यावेळी बौद्ध समाज कोअर कमिटी चे अध्यक्ष प्रकाश सांगोळे, इंजी. नरेश मेश्राम, सचिव हंसराज लाडगे, विभागीय अध्यक्ष विजय बंसोड, सल्लागार डाकराम वाघमारे, अशोक बोदेले, कायदेशीर सल्लागार बाळकृष्ण बांबोळकर, मंगेश शेंडे, उपाध्यक्ष साजन मेश्राम, प्रसिध्दी सचिव राजरतन मेश्राम, कार्याध्यक्ष भिमराव नगराळे, उपाध्यक्ष अनिता मेश्राम, सूरज ठवरे, सुनील साहारे, अजय ढोक, कविता निरंजने, मीना शेंडे, कुषावराव लोणारे, विजय मेश्राम, जगदिश बद्रे, अनिरुद्ध सहारे, लक्ष्मण नागदेवते, माजी पंचायत समिती सदस्य दिगांबर मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, ममता पेंदाम, पंकज चहांदे, पिंकू बावणे, विलास बनसोड, विजय पिल्लेवान, पवन गेडाम, सागर वाढई, नरेश लिंगायत, धनपाल, घुटके, नानाजी लांडगे, संजय गजभिये, राजकुमार मेश्राम, रिना ठवरे, सुरेश गणविर, मिलिंद मेश्राम, गौतम हुमने, आदी कोअर कमिटी व हजारोच्या संख्येने विविध सामाजिक व राजकीय संघटनाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.