” आजी – आजोबा म्हणजे काय ग. दुधावरची साय , संस्काराच नाव ,आई बाबांची माय .”
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे आजी आजोबा सन्मान सोहळा दि.26 /09/2023 रोज मंगळवार दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती कोरची चे गटशिक्षणाधिकारी मा.अमित दास सर यांनी भूषविले. उद्घाटक सौ.मनिषा राष्ट्रपाल नखाते
अध्यक्ष शा.व्यवस्थापन समिती कोरची, प्रमुख पाहुणे मा.अरविंद टेंभूरकर सर मुख्याध्यापक, मा .मुनेश्वर देशमुख, रामती बोगा, दिपक ढेक, संगीता अंबादे , लतिका ठलाल , दामोदर कुंभारे, शालिकराम हलामी, गेंदलाल मडावी, ढेलुराम जमकातन, महादेव जुळा ,बुक्केबाई हिडामी यांनी भूषविले. मा.हिराजी रामटेके सर केंद्र प्रमुख केंद्र कोरची, फुलोरा सुलभक दिलीप नाकाडे, शुक्ला ,वाघमारे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषविले. कार्यक्रमाची प्रस्तावना अरविंद टेंभूरकर मु.अ. यांनी केली. मारोती अंबादे यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाची माहिती सांगितली .प्रमोदिनी काटेंगे यांनी कुटूंबामध्ये आजी- आजोबा यांना महत्वाचे स्थान असावे याबद्दल मार्गदर्शन केले. महेश जाळे यांनी नातवंड आणि आजी आजोबा यांची आत्मियता असावी याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. मेघा बुराडे यांनी आजी आजोबा यांना वृद्धाश्रमात टाकू नये याविषयी मार्गदर्शन केले .आजी आणि आजोबा यांची संगित खुर्ची, गीतगायन स्पर्धा , आजीच्या हातावर मेहंदी काढण्यात आली .विजेत्यांना नोटबुक आणि पेन देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांता साखरे यांनी केले. आभारप्रदर्शन कु.आरती चांदेकर यांनी केले. सर्व आजी आणि आजोबा या कार्यक्रमामुळे भारावून गेले. आपल्याला मिळालेल्या मानसन्मानामुळे खूप आनंदित झाले.
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या आजी आणि आजोबांना शाल , श्रीफळ ,पुष्पगुच्छ , गळ्यात हार, टोप्या देऊन सन्मानित करण्यात आले. आजींना बटवा आणि टिकली पाकिट देऊन सन्मानित करण्यात आले.