कोरची
सुरजागडवरून लोहखनिज भरून निघणाऱ्या अवजड ट्रका गडचिरोली-कुरखेडा मार्गे बेडगाव घाटावरून कोरची छत्तीसगड, ओरिसा, बंगाल राज्याकडे जात आहेत. परंतु ह्या ट्रका नऊ किलोमीटरच्या बेडगाव घाटावरील पहिल्या चढावर चढू शकत नसल्याने अनेकदा चढावरून रिवर्स येताना दिसत आहेत. तर काही ट्रक रोडाखाली उलटले आहेत दरम्यान काही ट्रकांमध्ये बिघाड झाले असून त्या ट्रका रस्त्यातच उभे आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या दु चाकी व चार चाकी प्रवासी नागरिकांची वाहतुकीची कोंडी होत असून त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मागील पाच ते सहा दिवसापासून बेडगाव घाटावरील चढावावर आणि उतरावर सुराजगडच्या सात ते आठ ट्रका लोहखनिज भरुन छत्तीसगड राज्यातील आठ ते नऊ कारखान्यात निघालेल्या या अवजड ट्रका रस्त्याच्या मधोमध फेल पडल्या आहेत. घाटातील तीव्र चढावरून ट्रक वर चढू शकत नसल्याने ट्रक चालकासोबत असलेला व्यक्ती ट्रकच्या टायरमागे दगड ठेवत दम देत जीव धोक्यात घालून चढाव करित आहेत यावेळी मागून व समोरून येणारी अनेक वाहनांना रस्त्यावर थांबून राहावी लागते अशावेळी काही वाहने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्या तर अशा वाहनाचे अपघात होत आहेत. तर ट्रक चढावरून निघाल्यावर ट्रक मागील मोठं मोठे दगड रस्त्यावरच ठेवत असल्याने सुद्धा अपघात होत आहेत.
या घाटावर आतापर्यंत शेकडो वाहनांचे अपघात झाले असून अनेक जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे तर या घाटातील दरीमध्ये अनेक वाहने कोसळली आहेत सुराजगड येथुन लोहखनिज भरून निघालेल्या ट्रका क्षमते पेक्षा जास्त टन लोहखनिज ट्रकमध्ये लोड करून या मार्गाने येत असल्यामुळे या मार्गावरील रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून दु चाकी व चार चाकी वाहांचालकापुढे अपघाताला आमंत्रण मिळत आहे त्यामुळे संबंधीत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अशा अवजड वाहतून करणाऱ्या ट्रकांवर कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा या घाटावर मोठे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही.