निवडणूक अधिकाऱ्यांनी तब्बल 15 मिनिटे अगोदरच मतदान पेटी केली सीलबंद
कोरची :-
आदिवासी बहुल असलेल्या कोरची तालुक्यातील 7 ग्रामपंचायत मध्ये आज सार्वत्रिक निवडणूक पार पडली यामध्ये दवंडी ग्रामपंचायत मध्ये राडा निर्माण झाला असल्याची माहिती दवंडी येथील नागरिकांनी दिली असून निवडणूक सकाळी 7:30 ते 3 वाजेपर्यंत असताना सुद्धा 2:45 लाच मतदान पेटी सीलबंद करण्यात आल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे सूर दिसून आले.
एका दिव्यांग व्यक्ती व दोन म्हातारा व्यक्तींना निवडणूक करिता 2:40 ला घेऊन आले असता त्यांना मतदानाकरिता आत मध्ये घेण्यात आले परंतु त्यांना मतदान करू न देता बसवून ठेवून मतदान पेटी सिलबंद करण्यात आली असल्याचे धक्कादायक प्रकारात दवंडी ग्रामपंचायत मध्ये घडवून आले. आपल्या दिव्यांग सासरे व म्हाताऱ्या सासूला घेऊन आलेल्या रुपेश नंदेश्वर याला पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची माहिती रुपेश नंदेश्वर यांनी दिली.
सदर बाब ही गंभीर असून याबाबतची माहिती तहसीलदार प्रशांत गड्डम यांना दूरध्वनी द्वारे दिली असता याच्याशी माझे काही घेणे देणे नसून तिथे नेमून देण्यात आलेले निवडणूक अधिकारी यांनाच याबाबत माहिती असून तेच याचे उत्तर देतील व त्याची चौकशी व कार्यवाही करण्याचे अधिकार माझे नसून ते राज्य निवडणूक विभागाचे असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीची सुर दिसून आले.
नक्षलग्रस्त असलेल्या कोरची तालुक्यात निवडणुकीला समोर येण्यास बहुतेक मतदार हे पाठ फिरवत असतात अशा दिव्यांग व म्हाताऱ्या व्यक्तींनी निवडणुकीला समोर येऊन आपला हक्क बजावण्यासाठी तयारी तर दर्शवली व वेळेपूर्वी हजर सुद्धा झाले परंतु त्यांना आत मध्ये घेऊन सुद्धा मतदान करू देण्यात आले नाही.
*प्रत्येक बाबीकडे तहसीलदार यांचे दुर्लक्ष*
निवडणुकीची माहिती, फॉर्म भरण्यापासून तर निवडणूक पूर्ण होईपर्यंत तहसीलदार हे आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना कुठलीही माहिती विचारण्यात आली असता त्यांनी मला माहिती नाही निवडणूक अधिकारी माहिती देतील असेच उत्तर देत असल्याचे दिसून आले.
निवडणुकीमध्ये आपले कर्तव्य बजावीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सुद्धा ही माहिती दिली असून यामुळे तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून आता यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.