मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कोटगुल यथे संपन्न

 

अभियानसन 2023 च्या सरत्या वर्षाला महसुल विभागामार्फत मौजा कोटगुल दिनांक 31.12.2023 रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच सोबतील विकसित भारत संकल्प यात्रेचे नियोजन करण्यात आले.

सदर शिबिराचे उद्घाटन मा.कु.मंजुषा मेहतर कुमरे, सरपंच, ग्रामपंचायत कोटगुल यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी महिलांनी पुरूषांनी या शिबिराचा जास्ती जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे उदघाटक स्थानावरून बोलत होते. अध्यक्ष राजेश केजुराम नैताम, माजी सरपंच तथा अध्यक्ष जंगल कामगार सोसायटी, कोटगुल हे होते. विशेष अतिथि म्हणुन ,सौ.. सुमित्राबाई लोहंबरे, माजी जि.प.सदस्या, सौ.केसरबाई कृ. दर्रो, माजी पं. स. सभापती, कोरची, सौ. कलावंताबाई राकेश हलामी, सरपंच, ग्रामपंचायत कोसमी नं.2, सौ. मिनाक्षी महेश कोडाप, सरपंच, ग्रामपंचायत पिटेसुर, कु.गेलशन केजुराम नैताम, सरपंच, ग्रामपंचायत सोनपुर, श्री.संतानु नारद धिकोडी, सरपंच, ग्रामपंचायत अरमुरकसा, श्री.गांगसाय सुकलाल मडावी, सरपंच, ग्रामपंचायत मोठाझेलिया, श्री.इंदरसाय भुगदीराम कुमरे, सरपंच, ग्रामपंचायत नांगपुर श्री.श्रावणजी मातलाम माजी सभापती पं.स.कोरची श्री. राजेरामजी नैताम, अध्यक्ष, महाग्रामसभा पडीयालजोब उपस्थित होते.

तसेच विशेष अतिथी श्री. विलास गाडगे, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग गडचिरोली यांचे उपस्थिती तसेच मा.प्रशांत गड्डम, तहसिलदार, कोरची, श्री. राजेश फाये, संवर्ग विकास अधिकारी, कोरची, श्री.विनोद मडावी, तालुका आरोग्य अधिकारी,श्री.कुलकणी , पि.एस.आय, कोटगुल, श्री.शिंदे, पि.एस.आय. कोटगुल, डॉ. किरण जाधव पशु.वै.अधिकारी, श्री.सिध्देश्वर बेले, तालुका अभियान व्यवस्थापक MSRLM, कोरची हे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सदरचे कोटगुल येथिल शिबीरात खालीलप्रमाणे लाभ वितरीत करण्यात आले.

उमेद NRLM कडुन शाश्वत उपजिवीका निर्माण करणेकरीता सोनपूर येथिल 

बचत गटांना रु.2,00,000/- , कोटगुल येथिल  

 बचत गटांना रु.2,00,000/-, अरमुरकसा येथिल बचत गटांना रु.60,000/-, अलोंडी येथिल बचत गटांना रु.60,000/- व देवळभट्टी येथिल दोन बचत गटांना प्रत्येकी रु 60,000/-प्रमाणे CIF निधीचे धनादेश वाटप करण्यात आले.तसेच 8 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले

प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत 8 महिला लाभार्थ्यांना गॅसचे वितरण

 एकात्मिक बाल विकास कार्यालयकडून 11 महिला लाभार्थ्यांना बेबी किटचे वितरण, 

तहसील कार्यालय कडून जातीचे प्रमाणपत्र- 15, उत्पन्न प्रमाणपत्र -19 अधिवास प्रमाणपत्र- 10, उत्पन्न दाखले, 7/12 नमुना 8-अ , नकाशा चे 400 चे लाभ वितरीत करण्यात आले . 

श्रावणबाळ योजना सहा लाभार्थी व संजय गांधी योजना दहा लाभार्थी, दुय्यम शिधापत्रिका वाटप करण्यात येऊन पुरवठा विभागामार्फत एकूण 52 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. 

पंचायत समिती कडुन 4 लाभार्थ्यांना वैयक्तीक शौचालय चे लाभ देण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाकडुन 8 लाभार्थ्यांना शेळी पालन/ दुग्धव्यवसाय/वैरण विकास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

 आरोग्य विभागाकडून सिकलसेल, शुगर, रक्त तपासणी व इतर विविध प्रकारच्या तपासण्या तसेच 163 सिकलसेल तपासणी 54 , टि.बी.तपासणी 410 याप्रमाणे तपासण्या करण्यात आल्या. , 

 बँक ऑफ इंडीया, कोरची कडुन 4 लाभार्थ्यांना PMJJBY व PMSBY चे लाभ , को-ऑपरेटिव बँक, कोटगुल कडून 21 लाभार्थ्यांना pmsby योजनांचा लाभ तर सेतू केंद्राकडून -60 आधार कार्ड बनविण्यात आले. म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत जॉबकार्ड तसेच मजगी कामांचे कार्यरंभ आदेश देण्यात आले.

    शिबिरात महसूल विभाग, तालुका कृषी विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, उमेद बचत गट, बँक विभाग तसेच संजय गांधी योजना, सेतू व निवडणूक विभाग व गॅस एजन्सी, कोटगुल, केंद्र शासनाचे पोस्ट विभाग याप्रमाणे एकूण 21स्टॉल लावून विविध योजनांची जनजागृती करून गरजूंना लाभ दिले. कोरची तालुक्यातील कोटगुल येथे घेण्यात आलेले हे तिसरे शिबिर असून यामध्ये महिला सशसक्तीकरण शिबिराचे लाभ घेण्यासाठी कोटगुल परिसरातील कोटगुल, कोसमी नं.2, नांगपुर, अरमुरकसा, पिटेसुर, मोठाझेलिया व सोनपुर ,अशाअतिसंवेदनशील ग्रामीण भागातील सात ग्रामपंचायतमधील 35 गावातील मोठ्या संख्येने महिला पुरुष शिबिरात उपस्थित होते.

        दरम्यान शासकीय विभागाकडून अनेक ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना योजनांपासून अनेकदा लाभ घेता येत नाही त्यासाठी या शिबिराचा आयोजन शासनाकडून करण्यात आले असून कोटगुल येथील शिबिरात एकाच छताखाली सर्व विभागातील २१ स्टॉल लावून जनजागृती करून लाभ देण्यात येणार असल्याचे उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन कण्यात आले तर विविध लोककल्याणकारी योजनेची माहिती सुद्धा देण्यात आले. या शिबिराचे प्रास्ताविक प्रशांत गड्डम, तहसीलदार कोरची, संचालन रवी शहारे मुख्याध्यापक टिपगड विद्यालय कोटगुल तर आभार एस एस बारसागडे मंडळ अधिकारी यांनी केले.