कोरची येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

कोरची:-

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा माळी समाज कोरचीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ, हर्षलताताई भैसारे नगराध्यक्ष नगरपंचायत कोरची

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्याताई केवास नगरसेविका नगरपंचायत कोरची, विठ्ठल गुरनुले नगरसेवक नगरपंचायत कोरची, आशिषअग्रवाल पुढारी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, मुरलीधर रुखमोडे,नंदू वैरागडे, निळाताई कींनाके, साखरे मॅडम बौद्ध समाज अध्यक्ष कोरची, विजय कावडे, दिलीप कावडे, कमलेश भानारकर, नारायण मोहूर्ले, बेबीबाई मोहूर्ले सत्यभामा मोहूर्ले,

तसेच प्रमुख मार्गदर्शक नंदकिशोर गोबाडे मुख्याध्यापक श्रीराम विद्यालय कोरची, कांता साखरे शिक्षिका जिल्हा परिषद शाळा कोरची, रेखा राऊत शिक्षिका आश्रम शाळा कोरची, त्रिवेणीगायकवाडआदर्श शिक्षिकाजांभळी, वरील मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,कांतिसूर्यज्योतिराव फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. वरील मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शनातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच समाजाच्या विकासासाठी सावित्रीबाई फुले व ज्योतिरावजी फुले यांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे असे आपल्या प्रबोधनातून पटवून दिले. त्यानंतर छोट्या मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन व गीत सादर केले, त्याबरोबर डान्स ठेवण्यात आले होता.माळीसमाजातील रेखाबाई गावतुरे राहणार बेलगाव घाट यांनी शेतीच्या माध्यमातून गरीब परिस्थितीला मात करून उंच भरारी घेतली आणि समाजाला एक प्रेरणेचा स्थान मिळविले त्यांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले त्याचबरोबर माळी समाजातील वर्ग दहावी मध्ये कुमकुम धनराज मोहूर्ले 84%

जगदीश विनायक जेंगठे 79% शुभम धनाजी जेंगठे 67% या तिनही विद्यार्थ्यांनी माळी समाजातून सर्वोत्कृष्ट गुण घेऊन माळी समाजाचं नाव लौकिक केल्यामुळे त्यांना इंग्रजी डिक्शनरी आणि पेन देऊन गौरविण्यात आले.

दुपारी चार वाजता महात्मा फुले चौक ते लुम्बिनी बोद्ध विहार पर्यंत रॅली काढण्यात आली विहारामध्ये जाऊन भगवान गौतम बुद्ध, ज्योतिरावजी फुले, व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले सोबत बुद्ध वंदना घेण्यात आली, त्यानंतर सायंकाळी सर्व समाज बांधवांचा महाभोजनाचं नियोजन करण्यात आलेला होता, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष मोहूर्ले,श्रीहरी मोहूर्ले,अंजित मोहूर्ले, संजीव मोहूर्ले, मानसी वाढई, तसेच शिवाजी महाराज ग्रुप,शारदा मंडळ ग्रुप,श्री गणपती गृप, तथा संपूर्ण माळी समाज तसेच बौद्ध समाजाने सहकार्य केले