“खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो.” तसेच विद्यार्थांवर मूळ संस्कार शिक्षकच करतात.
– मा. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन
कोरची :-येथिल पारबताबाई विद्यालयात ०८ जानेवारी ते १० जानेवारी तीन दिवसीय स्नेहसंमेलन तथा बालक -पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. सुधाकर अडबाले शिक्षक आमदार नागपुर विभाग हे होते. तर अध्यक्षस्थानी बौध्द महासभेचे अध्यक्ष रामदास साखरे होते. प्रमुख अथितीम्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोली चे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे , प्रा. प्रदीप चापले वनश्री महाविद्यालय गुरूदेव नवघडे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट् राज्य जुनी पेंशन संघटना ,श्रावण अंबादे सचिव बौध्द महासभा ,शाळेचे मुख्याध्यापक शलिकराम कराडे ,मनोज अग्रवाल तालूका अध्यक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस कोरची ,शेलेन्द्र बिसेन नगरसेवक कोरची ,रामदास मसराम , आशिष अग्रवाल जिल्हा प्रतिनिधी पुढारी न्यूज़ चॅनेल ,नंदकिशोर वैरागडे जिल्हाप्रतिनिधी पत्रकार संघटना ,राहुल अंबादे पत्रकार तालूका प्रतिनिधी लोकमत ,पांडुरंग नागपुरे मुख्याध्यापक ,नामदेव नागपुरे तालूका अध्यक्ष विमाशी ,रवी साहरे मुख्याध्यापक ,हिवराज सोमनकर मुख्याध्यापक ,अजय पुल्लुरवार सचिव विमाशी ,हिरालाल उइके पालक प्रतिनिधी ,कविता उइके ,हरिश्चंद्र भोवते आदी उपस्थीत होते.
‘‘विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम शाळा नेहमीच करत असते,’’ असे मत कार्यक्रमाची उद्घाटक मा. सुधाकरजी अडबाले यांनी व्यक्त केले.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरस्वती पूजन व कार्यक्रमाचे उदघाटन मा. सुधाकरजी अडबाले शिक्षक आमदार यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री छत्रपती शिवराय यांच्या नृत्याने झाली.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मा. सुधाकरजी अडबाले शिक्षक आमदार नागपूर विभाग व अजय लोंढे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोलीचे कार्यवाह यांचे विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शलिकराम कराडे यांनी केले. संचालन जीवन भैसारे तर आभार वसंत गुरनुले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक हरिश्चंद्र मडावी ,सुरज हेमके ,महेश चौधरी ,कृष्णामाई खुने ,निर्मला मडावी श्यामराव उंदीरवाडे ,मुन्शीलाल अंबादे, पराग खरवडे ,कैलास अंबादे ,सुरेश जमकातन ,तसेच वर्ग दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य.