कोरची शहरात प्रवेश करता, “जरा जपून पाऊल टाका”

 

शहरांतर्गत अनेक खड्डयाकडे नगरपंचायतचा दुर्लक्ष अपघात झाल्यावर देणार काय लक्ष, प्रवासी नागरिकांचा सवाल?

 

कोरची

कोरची शहरात प्रवेश करताना रस्त्यावर पडलेल्या मोठं-मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक प्रवासी नागरिकांची दुचाकीने अपघात होत आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या वार्ड क्रमांक 2 व 11 मधील पुलावर मागील कित्येक दिवसापासून पूल तुटून त्या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्डावरून जड वाहतुकीमुळे खड्डा पुन्हा पुन्हा पसरत मोठ झालं आहे. त्यामुळे या मार्गावरून अचानक भरधाव वेगाने येणारी चार चाकी वाहन, दुचाकी या खड्ड्यात घुसून अपघात होऊन मोठ नुकसान होत आहे याकडे नगरपंचायत प्रशासन सर्रास दुर्लक्ष करित आहेत.

शहरांमधील अनेक मार्गावर मोठ-मोठी खड्डे पडली असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे नगरपंचायत अधिकाऱ्यांना याबाबत विचारले तर काही दिवसातच खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन देऊन टाळाटाळ करतात. यापूर्वी मरारटोली-कोचीणारा रस्त्यावर विहिरीचा सांडपाण्यामुळे मोठं खड्डा पडला होत त्याचे लोकमत वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्यानंतर त्या खड्ड्याला बुजवण्यात आले होते. जोपर्यंत वृत्तपत्रामध्ये समस्याबाबत बातमी छापून येत नाही तेव्हापर्यंत नगरपंचायत प्रशासनाला जाग येत नाही. तसेच या खड्ड्यामुळे वाहनचालकांच कुठलाही मोठा अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतरच नगरपंचायत याकडे लक्ष देईल काय तर दुर्घटना ग्रस्त परिवाराची जबाबदारी नगरपंचायत प्रशासन घेणार काय? असा सवाल शहरातील प्रवासी नागरिक करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी शहरातील काही युवकांनी स्वखर्चाने ट्रॅक्टरनी मुरूम बोलावून मुख्य मार्गावरील पडलेल्या खड्डयात मुरूम टाकून काही खड्डे बुजवले होते. कारण या मार्गावरून प्रथमतः च समाज प्रबोधनकार येणार होते. परंतु येथे परत खड्डे पडली असून पडलेल्या खड्ड्यामध्ये कोरची टी पॉईंट ते मुख्य बाजार चौक रस्ता, मुख्य बाजार चौक ते तहसील ऑफिस डांबरीकरण रस्त्यावर अनेक खड्डे पडली आहेत. तर टी पॉईंट पासून कोरची तलावाकडून शहरात जाणाऱ्या एका लहान पुलावर पडलेला मोठा खड्डयामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानी तात्काळ याकडे लक्ष घालून सदर खड्डे दुरुस्त करावी असे प्रवासी नागरिकांकडून मांगणी केली जात आहे.

 

कोट

यासंदर्भात कोरची नगरपंचायत मुख्याधिकारीला विचारणा केली तर म्हणाले की, पडलेला खड्डा किती मोठं आहे ते बघावे लागेल त्यानुसार ते लवकरात लवकर दुरुस्त होत असेल तर करता येईल उशीर लागत असेल तर उशीरा दुरुस्त होईल. 

डॉ. कुलभूषण रामटेके

मुख्याधिकारी नगरपंचायत कोरची.