दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कुमकोट येथील मंडईत (जत्रेत) हजारो भाविकांची उपस्थिती

 

 

 

आजही पारंपरीक पद्धतीने साजरी केली जाते देव मंडई

 

 

कोरची :-

दरवर्षी  प्रमाणे यावर्षीही कोरची तालुक्यातील 60 गावची देवी राजमातेश्वरी राजमाता यांची पूजा अर्चना करून देवमंडई साजरी करण्यात आली. या मंडई निमित्य हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी 3 वाजता पारंपरिक पद्धतीने हातात साखळी, त्रिशूल व बांबूचे झेंडे पकडून मंडईच्या सभोवताल तीन फेऱ्या मारून या मंडईची सांगता करण्यात आली.

या मंडईला राजमातेची पूजा राजवैद्य व 60 गावातील पुजारींनी पारंपरिक पद्धतीने पूजा केली. या मंडईनिमित्य ग्रामसेवक संघटना तर्फे पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते ज्याचे उदघाटन गट विकास अधिकारी राजेश फाये यांच्या हस्ते करण्यात आले व रामदास मसराम यांच्या तर्फे पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते ज्याचे उदघाटन काँग्रेस चे वरिष्ठ कार्यकर्ते हकीमुद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. मंडईनिमित्य येणाऱ्या भाविकांसाठी विविध दुकाने सजली होती. जशी मिठाईची दुकाने, फळ भाजीची दुकाने, खेळणीची दुकाने व विविध खाद्य पदार्थ तसेच विविध प्रकारचे झुले सुद्धा या मंडईत लावण्यात आले होते. या मंडई मध्ये जागोजागी व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात राजीमसाय कल्लो राजवैद्य, नुरुटी नुरुटी, सीताराम होळी, राजेश होळी, फत्तेसाय होळी, मंसाराम बोगा, लोकेश कल्लो, सुरेश होळी, संदीप होळी, वादुराम नुरुटी, शामसाय होळी, दामेशाय गोटा आदींनी अथक परिश्रम घेतले. रात्री लोकांच्या मनोरंजनाकरिता छत्तीसगडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.