कोरची आश्रम शाळेत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

 

 

कोरची:-

 

कोरची येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरीकरण्यात आली.

सर्वप्रथम प्रतिमेच्या रुपात असलेले डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी वाचनालयातील निवडक विविध पुस्तकाचे वाचन करण्यात आले. यामध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.भैयालाल कुरसंगे यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक हे होते. अतिथी म्हणून प्रा.हरेश कामडी, परेश मेश्राम, प्रा.मनोज गजभिये, प्रा.अरुण कायंदे, प्रा.अभिमन्यू वाटघुरे,दिपक कचलाम, यामिनी देशमुख,जेष्ठ माध्यमिक शिक्षक भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे,कुणाल गोवर्धन, देवेंद्र मडावी,डाकराम ठाकरे,,गीता राउत,सुषमा अंबोने,लीना वाटघुरे,मनोज आचार्य , प्रशिल जांभूळकर,संतोष सहारे,नैना येगलवार अधिक्षका शिमा कुरेकार, मिलिंद पिलारे आदी उपस्थित होते.