आरमोरी येथे समुदाय आधारित संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी यांची एकत्रीकरण आणि सवेंदीकरण कार्यशाळा संपन्न.

 आरमोरी ……येथे समुदाय आधारित संस्था शेतकरी उत्पादक कंपनी यांची एकत्रीकरण आणि सवेंदीकरण कार्यशाळेचे आयोजन, जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, गडचिरोली यांचे मार्फत आणि तालुका कृषी अधिकारी, आरमोरी यांचे सहकार्याने करण्यात आले

 

. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली बसवराज मास्तोळी हे होते., तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील सनदी लेखापाल सुभाष रहांगडाले, मूल्य साखळी तज्ञ तुषार भिवापूरकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्वस्थापक महेश मेंढे, वडसाचे उपविभागीय कृषि अधिकारी निलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी कु. ज्योत्स्ना घरत, कुरखेडाचे तालुका कृषी अधिकारी एस.डी.रामटेके, कोरचीचे तालुका कृषी अधिकारी लकेश कटरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र दोनाडकर, विनोद रहांगडाले, कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे, व्ही. एम. शेंडे उपस्थित होते.

 

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, वडसा, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी आणि कोरची येथील समुदाय आधारित संस्था/ शेतकरी उत्पादक संस्था चे प्रतिनिधी यांना साधन व्यक्तीं यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत, स्मार्ट प्रकल्पातील विविध तरतुदी, योजना अंमलबजावणीची पद्धत, शेतकरी उत्पादक कंपनी च्या वैधानिक आणि प्रशासकीय बाबी, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सविस्तर प्रकल्प आराखडा, बँक कडील कर्ज प्रकरणे, मंजुरीची कार्य पद्धती, मूल्य साखळी विकास शाळा, स्मार्ट प्रकल्प प्रश्न उत्तर, ई विषयावर प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यशाळेची प्रस्तावना नोडल अधिकारी स्मार्ट गडचिरोलीचे रविकांत गौतमी यांनी केली, तर आभार कु ज्योत्स्ना घरत यांनी मानले. कार्यशाळेचे संचालन कृषी सहाय्यक‌ यशवंत सहारे यांनी केले.

 

कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी आरमोरी येथील तसेच स्मार्ट प्रकल्पाचे वित्त प्रवेश सल्लागार सचिन गोटे, लेखापाल किशोर कांबळे, संगणक चालक लखन माटे, कृषी सहाय्यक एन सी कुंभारे, पी जे मेश्राम, के बी मडकाम, कु स्मिता शंभरकर, कु डी के क्षीरसागर, कु विश्रांती वाढई, कु लीना करंगामी, कु. दर्शना श्रीखंडे, श्रीमती पेंदाम यांनी परिश्रम घेतले.