जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विद्यान केंद्र गडचिरोली वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना जाहीर
प्रतिनिधी गडचिरोली…
भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर येथून वर्तविलेल्या हवामान अंदाजा नुसार गडचिरोली जिल्ह्यात *दि. ०८ मार्च रोजी तुरळक ठिकाणी अती हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दि. ०८ मार्च रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे .
▪️ दि. ०८ मार्च रोजी तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता असल्याने, शेतकरी बंधूंनी कापणी केलेला रब्बी पिकांची साठवणूक सुरक्षित ठिकाणी करावी . साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक शीटने/ ताडपत्रीने झाकून ठेवावा.
▪️मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत. तसेच शेतकरी बंधूंनी विजांच्या बाबतीत अचूक पूर्वसूचना प्राप्त होण्यासाठी व जिवीतहानी टाळण्यासाठी दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा.