काळे गावातील वनरोप कामे तात्काळ बंद करा ; कोरची तालुका आम आदमी पार्टी व गावकरी करणार अन्यथा आंदोलन

 

कोरची
कोरची मुख्यालयापासून दोन कि.मी अंतरावर असलेल्या काळे परिसरात वनरोपाची कामे सुरू आहेत. ही कामे बंद करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. काळे हे गाव या जागेपासून आतमध्ये असल्याने जर या नंबरवर वनरोप तयार करण्यात आले, तर रोज ये-जा करण्यास त्रास होईल. गुरे चराईसाठी अडचण होईल. त्या जागेवर भगवान वीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बांधण्याचे नियोजन आहे.
सोबतच काही शेतकऱ्यांनी आपला उदरनिर्वासाठी शेतीची जागा पकडली आहे. तसेच हे स्थळ अगदी शाळेजवळ असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही जंगली प्राण्यांचा सामना करावा लागू शकतो. हे काम गावकऱ्यांना विश्वासात न घेता अचानक सुरू केले. एकंदरीत ही जागा सार्वजनिक चराई, इमारती व सार्वजनिक जलाऊ लाकडा करिता राखीव असून येथे रोपवन बनवण्यास आमच्या गावकऱ्यांचा विरोध आहे व आम आदमी पार्टी यांच्या समर्थनार्थ असल्याचे एका निवेदनात नमूद करण्यात आले आहें. हे निवेदन तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना आम आदमी पक्षातर्फे सादर करण्यात आले.
आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष धम्मदीप लालदास राऊत, हिरालाल उईके, संघटक मंत्री सरदार सिंग कुंबरे, रामू तोफा, शंकर कल्लो, संघासिंग कुंबरे, आकाश गोटा, शांतीबाई कुमरे, अशोक तोफा, मेतर बोगा, देवारीन माझी, यशवंतबाई कुमरे आदि गावकरी देताना उपस्थित होते. जर नर्सरीचे काम बंद झाले नाही, तर समस्त गावकरी व आम आदमी पार्टी कोरची यांच्याकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहें.