कोरची शहरात तीन ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ; सायंकाळी फटाक्याच्या आतिषबाजीत व डीजेच्या गजरात संपूर्ण नगरी दुमदुमली

 

तथागत गौतम बुद्ध व महापुरुषांचे वेश परिधान करून लहान बालकांनी वेधले नागरिकांचे लक्ष ; माळी समाज व भाजप नेत्याकडून अल्पोपहार, सरबत चे वितरण

कोरची
कोरची शहरात तीन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बौद्ध झेंडा स्थळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. कोरची पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन सामूहिकरीत्या घेऊन बुद्ध वंदना घेण्यात आले. तसेच धम्म भुमी येथील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ. हर्षलताताई भैसारे यांनी केला तर लुंबिनी विहारात येथील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी, नगरसेवक मनोज अग्रवाल, नगराध्यक्ष सौ हर्षलताताई भैसारे, रमाई महिला मंडळ अध्यक्षा सौ ज्योतीताई भैसारे, ज्येष्ठ नागरिक राधेश्याम साखरे, मंसाराम अंबादे, रामदास साखरे तथा सर्व बोध बांधव उपासक-उपासिका नवयुवक वर्ग उपस्थित होते.
भीम जयंती निमित्त सायंकाळी धम्म स्थळ ते बाजार चौक- महात्मा फुले चौक- लुंबिनि विहार पर्यंत फटाक्याच्या आतिषबाजीत व डीजेच्या गजरात, जय घोषात भव्य रॅली काढण्यात आली. यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. रॅलीमध्ये एका ट्रॅक्टरवर सजावट करून तथागत गौतम बुद्ध तर दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई या महापुरुषांचे लहान बालकांनी वेश परिधान करून नागरिकांचे लक्ष वेधले होते.
मुख्य बाजार चौकात माजी नगराध्यक्ष नासरुद्दीन भामाणी व नगरसेवक घनश्याम अग्रवाल यांनी रॅलीतील बौद्ध बांधवांना शरबतचे वितरण केले तर महात्मा फुले चौकात राकेश मोहूर्ले, संतोष मोहूर्ले, नगरसेवक विठ्ठल गुरुनुले संपूर्ण माळी समाज मसाला भात व शरबतची व्यवस्था केली होती. यावेळी फुले चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला बौद्ध बांधवांनी दीप प्रज्वलित नमन केला व प्राचार्य देवराव गजभिये यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माळी समाजाकडून बौद्ध समाजाला आम्ही सर्व एक आहोत असा एकतेचा संदेशही देण्यात आला. शेवटी लुंबनि विहारांमध्ये रॅलीची सांगता झाली.