बोटेकसा येथे शासकीय योजनांची जत्रा; १ हजार ३८१ विविध प्रमाणपत्राचे वाटप

 

 

कोरची‌

कोरची पासुन‌ १२ कि.मी अंतरावरील बोटेकसा येथे ०४ में गुरूवारला‌ तहसिल कार्यालय कोरची तर्फे शासकीय योजनांची जत्रा तथा महाराजस्व अभियान मेळावा संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार चंद्रशेखर गजभिये यांचे हस्ते झाले. अध्यक्ष म्हणुन बिहीटेकला ग्रामपंचायत सरपंच किशोर नरोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. गटविकास अधिकारी राजेश फाये, मर्केकसा ग्रामपंचायत सरपंच शामलाल गावडे, लाकेश कटरे कृषि मंडळ अधिकारी, मनोज वेलवादी पो.पा. बोटेकसा, नामदेव नागपुरे मुख्याध्यापक भ. हा. बोटेकसा, गिरीश अडभैय्या, खंडाईत साहेब को.ऑ. बॅक, लालचंद्र जनबंधू सर, दुधप्पा सिरगावे सह.निबंधक, कोटगले सर मुख्याध्यापक जिप. शाळा बोटेकसा, डॉक्टर खोबे, रेणू दुधे कृषि अधिकारी पं.स. कोरची होते.

कार्यक्रमाची सुरवात आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुन्डा यांचे प्रतिमेस माल्यार्पण व दिपक प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमात विविध विभागांच्या योजनांची माहिती तथा लाभ देण्यात आला. सर्व जनतेने शासकीय योजनांचे लाभ घेऊन आपले आर्थिक स्थान बळकट करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले. कार्यक्रमात जात प्रमाणपत्र 67, उत्पन्न प्रमाणपत्र 78, अधिवास प्रमाणपत्र 17, रहीवासी प्रमाणपत्र 43, नॉन क्रिमिनल प्रमानपत्र 08, खाजगी 7/12 – 567, वन हक्क 7/12 – 229, रेशनकार्ड 65, आधार कार्ड 43, इतर प्रमाणपत्रे 267 असे एकून 1381 प्रमाणपत्र वाटप तर संजय गांधी 37 अर्ज भरन्यात असुन घरकुल मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मुलीना 05 सायकलचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थिनी मनमोहक नृत्य सादर केले.

कार्यक्रमांचे संचालन प्रमोद धाईत मंडळ अधिकारी यांनी केले तर प्रास्ताविक प्रितम वैद्य तलाठी यांनी केले. आभार दिपीका मडावी तलाठी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता मोरेश्वर पटले अ.का. महेंद्र बारसिगे, नंदागवली, भगत, तलाठी गाथे, तलाठी किरण साळवे, तलाठी निकुरे, सोरते, टेकाम, हिडामी, नारनवरे तसेच कोतवाल रमुला, बिरेन कोराम, प्रदिप नरोटे, अनिल, गुलाब, सुनिता, मोनी, लसंत्री, निलम, कुन्दा, तारा, विजय, चंद्रशेखर, गुलशन व भगवंतराव हायस्कूल येथिल कर्मचाऱी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. उपस्थितांना सहभोजन देण्यात आले.