आरमोरी नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पालोरा व शास्त्रीनगर शेगाव येथिल विविध विकास कामांचे भूमिपूजन दि.२६ जून ला करण्यात आले.
विधानपरिषद सदस्य आ.रामदासजी आंबटकर यांनी पाठपुरावा करून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन .कडून आरमोरी नगरपरिषद मधील विविध प्रभागात १ कोटी २० लक्ष रुपयाचा निधी प्राप्त करून दिला.
विकास कामात पालोरा येथील दोन रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण , शास्त्रीनगरातील एका रस्त्याचे सिमेंटिकरण त्याच प्रमाणे प्रभाग १ मधील तीन रस्त्यांचे सिमेंट-कांक्रिटिकरन प्रभाग ३ बाजारपेठ येथील रस्त्यांचे मजबुतीकरण व सिमेंटिकरण ई.कामे समाविष्ट करण्यात आले.
पालोरा येथील खडीकरण कामाचे काल दि २६ जून रोजी भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी आरमोरी नगरपरिषदचे आरोग्य व स्वच्छता सभापती भारत बावनथडे,नगरसेवक मिथुन मडावी ,कवळू धोटे,कृष्णा खरकाटे,नामदेव दर्वे,देवा धोटे,अशोक हारगुळे,प्रफुल धोटे,विलास हारगुळे,खुशाल सोरते,रविंद्र टेकाम, बळीराम बुराडे, अरुण ढोरे,डोनू हारगुळे,नरेश ढोरे,वैभव कुथे,कमलेश धोटे,सागर हारगुळे,पराग हारगुळे, टिंकू बोडे,अमोल खेडकर,चंदू मडावी,देवा वाघाडे, मंगेश भोयर,रवी निंबेकार, अमित जाऊजलकर ,शंकर धकातें, अमित राठोड,संजय सोनटक्के,विक्की रोडगे,कैलास खोब्रागडे,पंकज चिलबुले,व गावातील नागरिक उपस्थित होते.