वाजत गाजत मिरवणूक काढून गावकऱ्यांनी दिला सेवानिवृत्त शिक्षकाला निरोप… गोडसे गुरुजींची सेवा निवृत्ती गावक-यांना रडवून गेली

 

आरमोरी ….. शासकीय सेवेत कार्यरत असताना सेवानिवृत्ती अटळ आहे. नियत वयोमानानुसर सर्वच सेवानिवृत्त होतात.मात्र काही कर्मचारी शिक्षक आपल्या कार्य कर्तुत्वाने गावकऱ्यांची मने जिंकतात.असाच एक गहिवरलेला भावूक प्रसंग देऊळगाव घडला .सेवानिवृत्त झालेल्या आपल्या शिक्षकांची गावकऱ्यांनी वाजतगाजत मिरवणूक काढून व ठिकठिकाणी सत्कार करुण गावकरी व विद्यार्थ्यानी सेवानिवृत्त शिक्षक नागसेन गोडसे याना निरोप दिला. सदर भावूक वातावरणाने शिक्षकांसह गावकरी व विद्यार्थ्याचे डोळेही पाणावले.

आरमोरी तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय देऊळगाव येथे ३० वर्षाची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर नागसेन गोडसे हे नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले. आपल्या तिस वर्षाच्या सेवेत त्यानी अनेक विद्यार्थी घडविले. अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. एक शिक्षक म्हणुन त्यानी लोकांच्या मनावर एक चांगली छाप उमटवली गावकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासोबत अनेकांच्या मदतीला ते धाऊन जात होते. एक नाटककार ,चित्रकार, मूर्तिकार, कवी, साहित्यिक, लेखक व एक उत्कृष्ठ शिक्षक म्हणुन विवीध क्षेत्रात त्यांनीआपल्या कार्याची छाप उमटविली. त्यामुळे त्याची सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडली गेली.

. आपल्या शिक्षकाची सेवानिवृत्ती झाली याचे दुःख विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना झाले.आणि त्यांनी सेवानिवृत्तीचा निरोप समारोह कार्यक्रम गावकऱ्यांनी थाटात आयोजित केला. कार्यक्रमाला शाळेतील संपूर्ण विद्यार्थी गावकरी महीला सहभागी झाले होते.

ढोल ताशाच्या गजरात नागसेन गोडसे गुरुजी यांची मिरवणूक गावकऱ्यांनी काढली. सदर रॅली गावातूनच फिरविण्यात आली. गुरुजींच्या स्वागतासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती.ठिकठिकाणी त्यांचें औक्षण करून कुणी भेटवस्तू देऊन व कुणी शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करीत होते.यावेळी अनेकाना गहिवरून आल्याने अश्रू अनावर झाले. असा शिक्षक आता येणे शक्य नाहीं असे बोलून दाखवीत होते.

यावेळी गावकऱ्यांनी गुरुजींच्या सन्मानार्थ सुगम संगीताचा कार्यक्रम ही आयोजीत केला होता.शिवजयंतीचा मंडळाच्या वतीने नागसेन गोडसे गुरुजींना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन गौरविण्यातआले.. दुर्गा मंडळाच्या वतीने गुरुजींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आपल्या आवडत्या गुरुजींच्या निरोपाला गावकऱ्यांची गर्दी उसळली होती. इतकेच नाही तर परिसरातील विद्यार्थ्याचे पालक, गुरुजींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुद्ध समाज देउळगाव या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेठकर, भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुण गुरुजींच्या आठवणीसाठी बोधीवृक्ष लावण्यात आला.. कार्यक्रमाला माजी जिल्हा परीषद सदस्य संपत आळे, ‘ज्ञानबोनवार , किशोर सोमकर, योगेंद्र बनसोड प्रा., अमरदिप मेश्राम सह अनेक मान्यवर, विविध मंडळाचे पदाधिकारी,शाळेतील विद्यार्थी तथा गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.