मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी; कोरची येथिल नागरिकांची मुख्यमंत्रीला निवेदन

 

 

कोरची

मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे हा समाजाला लागलेली कीड आहे याच्यावर कठोर कारवाही करणेबाबत ०२ आगष्ट रोजी कोरची येथिल नागरिकानी कोरची तहसीलदार मार्फ़त मुख्यमंत्री ला निवेदन पाठविन्यात आले आहें.

निवेदनात संभाजी भिडे यांनी सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ज्या थोर महापुरुषांनी समता आणि मानवतावादी विचार समाजात पेरून समतामुलक समाज निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले असे क्रांतिकारक महात्मा फुले व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपुर्ण योगदान देणारे थोर नेते महात्मा गांधी यांचे विषयी अतिशय आक्षेपार्ह आणि बेजबाबदार विधाने करण्याचा जनुकाही विडाच उचलला आहे. वारंवार देशातील थोर महापुरुषांबददल आक्षेपार्ह विधाने करून संभाजी भिडे याने जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो.

संभाजी भिडे या नालायक व निच प्रवृत्तीच्या मानसाला सत्ताधारी पक्षांनी अभय देण्याचे काम केल्याचे दिसुन येते. त्यामुळे संभाजी भिडे हा वारंवार देशातील व महाराष्ट्रातील थोर संत व महापुरुषांचा घोर अवमान करून शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांनी जोपासलेल्या महाराष्ट्र धर्माला बुडविण्याचा प्रयत्न जानीवपुर्वक करीत आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करन्याची मागणी येथिल नागरिकानी केली आहें.

कोरची नायब तहसीलदार गणेश सोनवाणी, अनंत बोदेले यांना निवेदन देताना फुले,शाहू,बिरसा, आंबेडकर, विचारमंच ग्रुप चे सध्यक्ष राकेश मोहुर्ले, अजीत मोहुर्ले, रोशन शेंडे, मनोज अग्रवाल, वशिम शेख, राजू टेंभुर्णे, चेतन कराड़े, अविनाश हुमने, सुधाकर हिडामी, आनंद पंधरे, नसिम जाडिया, विनोद गुरनुले, विजय चौधरी, विनोद वाल्दे, पंजाबराव उईके, रामदास कल्लो, चंदू वाल्दे आदि युवा नागरिक उपस्थित होते.