नर्सेसनी समाज सेवेतून आरोग्य हित सांभाळावे – सुधाकर साळवे

 

नर्सिंग स्कूल मध्ये निरोप समारंभ व 1st year लॅम्प लाइटिंग चा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

ज्या परिचारिकेचे प्रशिक्षण व अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे त्या परिचारिकेची जबाबदारी वाढलेली आहे. चांगल्या वृत्तीने परिचारिकांनी समाजसेवा करून आरोग्य हित सांभाळावे असे प्रतिपादन येथील श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग चे संचालक व श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स वाकडीचे अध्यक्ष सुधाकर साळवे यांनी केले.
श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरी च्या वतीने विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचा अध्यक्ष असताना वरून ते बोलत होते. निरोप समारंभ नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये डान्स स्पर्धा डान्स स्पर्धा नाट्य स्पर्धा फॅशन शो स्पर्धा घेण्यात आली.
समाजसेवेचे मृत स्वीकारून भावी आयुष्यात आरोग्याच्या क्षेत्रातील सर्व प्रशिक्षणार्थींनी समाजातील गरीब गरजू रुग्णांचे निस्वार्थपणे सकारात्मक दृष्टिकोनातून आरोग्य सेवा रुग्णांना द्यावी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी माता सावित्रीबाई फुले लॉरेन्स नाईट अँगल मदर तेरेसा डॉक्टर सुशीला नायर डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवा द्यावी असे मत राष्ट्रवादीचे गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी मत व्यक्त केले. आरोग्य दूत म्हणून परिचारिकांनी समाज सेवा करावी असे मत भाजपचे तालुकाध्यक्ष श्री पंकज खरवडे यांनी आपले मत व्यक्त केले. श्री दिलीप घोडाम व महेंद्र रामटेके यांनीही भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देऊन रुग्णसेवा निस्वार्थ भावनेने करावे असे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन संकेत बुद्धेवार, सेलिना लकडा, निषिध करंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश अल्लीवार यांनी केले.
कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पूनम नारनवरे , संगम मेश्राम, पल्लवी कोथळकर , भूषण ठकार, स्वप्नील धात्रक, शालिनी भोयर, अल्का मारभते, स्नेहा बोरकर, वासुदेव फुलबांधे, दुधराम धकाते, नितीन कोहपरे यांनी सहकार्य केले.