कोरची-कोचीनारा रस्त्यावर झाड पडल्याने रहदारीस अडचण; कोचीणारा वासीयांना दोन किमीचा फेरा 

 

 

कोरची

सोसाट्याच वादळ वारा व पावसामुळे मंगळवार रात्रो दरम्यान कोचीणारा-कोरची मरारटोलीजवळच्या मुख्य रस्त्यावर एक विशाल मोठं आंब्याचा झाड कोसळले आहे त्यामुळे या मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. तर कोरचीला येण्यासाठी कोचीणारा गावासह या परिसरातील नागरिकांना दोन किमीच गुटेकसा गावाकडून उलट फेरा टाकून कोरचीला जावे लागत आहे.

सदर झाड रात्री दरम्यान पडले असून सकाळपासून सायंकाळ पर्यंत जसेच तसेच तिथेच पडून आहे अजून पर्यंत या झाडाला बाजूला करण्यात आलेले नाही. या झाडाच्या फांद्या विद्युत तारावर पडल्यामुळे विद्युत तारा तुटल्या होत्या त्या तारा दुपारपर्यंत विद्युत विभागाकडून जोडण्यात आलेले आहेत. परंतु संबंधित विभागाने अजून पर्यंत सदर झाड बाजूला केलं नसल्यामुळे परिणामी कोचीणारा गावातील नागरिकांना या रस्त्यावर जाणे-येण्यास अडचण निर्माण झाली असून त्यांना पर्यायी मार्गाने व पडलेल्या झाडाच्या घरा मागून एका चिखल मार्गाने पायदळ गावी जावे लागत आहे.

विशेष म्हणजे सनासुदीचे दिवस सुरू असून सध्या सर्वत्र गणपतीची स्थापना करून पूजा अर्चना करणे सुरू आहे असे असून कोरची येथील आठवडी बाजार गुरुवारी भरत असून खूप मोठा बाजार भरत असतो परंतु यावेळी कोरची शहरातील गणरायांचे विसर्जन गुरूवारलाच शहरातून मिरवणूक काढून विसर्जन केले जाणार असल्यामुळे येथील आठवडी बाजार आज बुधवारी भरवण्यात आले त्यामुळे शेजारील गावातील अनेक नागरिक या बाजारामध्ये भाजीपाला व अन्य खरेदी करण्यासाठी येत आहेत त्यामध्ये एक कोचीनारा गाव व या परिसरातील सात ते आठ गावातील नागरिक या मार्गाने कोरचीला येण्यासाठी निघाले असता अशा नागरिकांना रहदारिस अडचण निर्माण झाली आहे.