कोरची संस्कार क्रेडिट को ऑपरेटिव्ह बँक शाखेतील ग्राहकांच्या लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणातील बँकेतील दोघा कर्मचारीला अटक

 

 

कोरची

कोरची शहरातील संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेतील ग्राहकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम फसवणूक केल्याबद्दल कोरची पोलिसात चार जणांविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर येथील दोघांना पोलिसांनी २६ सप्टेंबर ला अटक केली आहे.

शुभम परिहार (वय २८) राहणार कुरखेडा, मुणेश्वर पारधी (वय २५) राहणार कुरखेडा, असे कोरची पोलिसांनी अटकेत घेतलेल्या आरोपींची नाव असून इतर दोघे आरोपी प्रभावती परिहार वय (४५) रा कुरखेडा, लोमेश पारधी (वय २६)रा कुरखेडा अशी नावे आहेत. यातील आरोपी शुभम परिहार व मुनेश्वर पारधी हे संस्थांमध्ये अभिकर्ते म्हणून कार्यरत असताना त्यांनी खातेधारकांचे आरडी खात्याचे पैसे गोळा करून ते संस्थेमध्ये जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून खातेधारकांची 12 लाख 21 हजार 960 रुपयाची फसवणूक केली असल्याची तक्रार आहे.

या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या आरोपीसह प्रभावती परिहार व लोमेश पारधी यांनी पत्रकार परिषद भरवून पेपर मध्ये संस्था विषयी खोटी माहिती प्रसारित करून संस्था व संस्थेचे अध्यक्ष मनीष फाये यांची बदनामी केली असल्याचे या चार आरोपी विरोधात पोलीस स्टेशन कोरची येथे संस्था अध्यक्ष मनीष फाये यांनी २५ सप्टेंबरला तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर अप क्र 97/23 कलम 409, 420, 501, 34 भांदवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले असून अधिक तपास कोरची पोलीस अधिकारी करीत आहेत.