आरमोरी पं.स.चे माजी सभापती तथा आरमोरी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सागर मने यांचे वडील चंद्रशेखर मने यांचे निधन

आरमोरी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,सुप्रसिद्ध दुर्गा माता देवस्थान प्रतिष्ठान चे विद्यमान अध्यक्ष, आरमोरी ग्रामपंचायत चे माजी सरपंच,तथा माजी पंचायत समिती सभापती आदरणीय श्री चन्द्रशेखरभाऊ मने यांचे आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता नागपूर येथील सिटी केअर दवाखान्यात अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांची वय ६७ वर्षे होती.त्यांचे पश्चहात त्यांना पत्नी,दोन मुले,सून असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी नाव लौकिक प्राप्त केला, ते निश्वार्थ सेवाभावी नेता होते. यावर्षी त्यांना नुकतेच येथील म.शि प्र.मंडळ द्वारा सेवाभाव पुरस्कार तसेच श्री स्व. किसनरावजी खोब्रागडे शिक्षण संस्थाद्वारा सेवाभाव पुरस्कार तर अष्टविनायक गरबा मंडळाकडून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल,सत्कारपुर्ण गौरविण्यात आले.त्यांच्या यथोचित मार्गदर्शनामुळे यावर्षीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाला.उद्या दि .२७ ऑक्टोम्बरला दुपारी १२.०० वाजता त्यांचे गाढवी नदीतीरावर त्यांचे पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहे.