बेडगाव घाटावरील रस्त्याचे लोखंडी कठडे वाहन चालकांना अपघातास देतात आमंत्रण

 

 

कोरची

कोरची तालुक्यातील कोरची-कुरखेडा मार्गावरील बेडगाव समोर नऊ किमी घाटातील डांबरीकरण रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेली लोखंडी पत्र्यांची कठडे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना अपघातास आमंत्रण देत आहेत. तर घाटातील रस्त्याच्या तीव्र चढ-उतार डांबरीकरण खाली एक ते दीड फूटाची खड्डे पडले असून अवजड ट्रक वाहने मोठं-मोठी दगडे ठेवल्यामुळे विरुद्ध दिशेने येणारी वाहने रस्त्याखाली उतरली की अपघात होऊन वाहन चालकांच्या वाहनांची मोठी नुकसान होत आहे.

काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बेडगाव घाटावरील रस्त्याच्या वडना-वडावर वाहन दरीत कोसळून जाऊ नये म्हणून लोखंडी पत्र्याचे कठडे या ठिकाणी उभारण्यात आले आहे. परंतु या मार्गाने नेहमीच अवजड वाहनांची २४ तास वर्दळ सुरू राहते. क्षमतेपेक्षा जास्त ट्रकमध्ये माल भरून निघणारी ट्रक या घाटावरील चढावर चढू शकत नाही परिणामी ट्रक रिव्हर्स येऊन या कठड्यावर धडकत आहेत. तसेच मागून येणारी वाहन चालक सावध नसली तर मोठे अपघात सुद्धा होताना दिसत आहे.

या घाटातील रस्त्याच्या एका वडणावर लोखंडी कठड्याचे पत्रा थेट रस्त्याच्या दिशेने वाकले आहे त्यामुळे अचानक वाहन मागून पुढे ओव्हरटेक करताना या वाकलेल्या लोखंडी पत्रास ठोस लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या उतार-चढावर डांबरीकरण रस्त्याच्या बाजूला टाकलेली मुरूम पूर्णपणे पावसाळ्यात खाली वाहून गेली आहे त्यामुळे येथे एक ते दीड फुटाच खड्डा पडलेले असून अवजड ट्रक चालक ट्रक चढावरून पुढे काढताना मोठं मोठी दगडाचे वापर करून ते बाजूलाच सोडून देत आहेत यामुळे मोठं अपघात होत आहेत.

काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक ट्रक रस्त्याच्या कडेला उलटले तर अनेक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकले असून वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे संबंधित विभागाने या तुटलेल्या धोकादायक लोखंडी कठड्याची व्यवस्था करून पत्रे सरळ करावे तसेच दरवर्षी पावसाळ्यात डांबरीकरण रस्त्याच्या बाजूला टाकलेली मुरून वाहून जात असल्याने त्या ठिकाणी सिमेंट कांक्रेटच काम करावे जेणेकरू रस्त्याखाली वाहने गेली तर अपघात होणार नाही असे वाहन चालकाकडून बोलले जात आहे.