युवारंग मुलांना शारीरिक व मानसिकरित्या घडविणारी संस्था :- मा.देवानंदजी दुमाणे

 

 

आरमोरी:- दि.२९/१०/२०२३ रविवार ला  सायंकाळी ठीक ५:३०वाजता, स्वामी विवेकानंद विद्यालय,आरमोरी च्या पटांगणावर युवारंग तर्फे निशुल्क कराटे प्रशिक्षणाचा उदघाटन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे मुख्य प्रशिक्षक मा. राजुजी घाटूरकर सर तर सहउद्घाटक मा. चंदाताई राऊत सामाजिक कार्यकर्त्या ,आरमोरी कार्यक्रमाचे

अध्यक्ष म्हणुन मा.देवानंदजी दुमाणे अध्यक्ष वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरी प्रमुख अतिथी म्हणुन स्वयं रक्तदाता संघटना जिल्हा, गडचिरोली चे अध्यक्ष मा. चारुदत्त राऊत सर ,युवारंग चे उपाध्यक्ष मा. मनोजजी गेडाम ,सामाजिक कार्यकर्ते मा.रणजित भाऊ बनकर सामाजिक कार्यकर्त्या मा.विभाताई बोबाटे उपस्थित होते याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा.देवानंदजी दुमाणे यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाची गरज काय आहे व त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, शिस्त, समर्पण या बदल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन राहुल जुआरे यांनी केले तर प्रास्ताविक मनोज गेडाम व आभार पंकज इंदूरकर यांनी मानले याप्रसंगी युवारंग चे सद्स्य व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.