जीवनावश्यक अडचणीचा सामना करणाऱ्या महिला, त्याकरिता महिलानों समोरे व्हा! संदीप ठाकूर
आरमोरी तालुका राष्ट्रवादी चे खंदे समर्थक तथा कार्यकर्ते संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी येथील विश्राम गृहात दिनांक 14 डिसेंबर 2023 ला सायंकाळी 4:00 वाजता सोनूताई अंबादे यांनी आपल्या शेकडो महिला कार्यकर्ते सोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
कार्यकर्त्यांना संबोधीतांना संदीप ठाकूर म्हणाले की, राजकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर समाज हितासाठी व सामाजिक कार्यासाठी करायला पाहिजे. आरमोरी नगर परिषद क्षेत्रात नागरिकांच्या विविध अडचणी असून आवश्यक त्या महत्वपूर्ण बाबीवर जाणीवपूर्वक अवलक्ष करून शासकीय निधीचा स्वहितासाठी व कमिशन खोरीसाठी उधळपट्टी मागील पाच वर्षांपासून केली गेली आहे. पारिवारिक व सामाजिक जीवनात महिलांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. मग आरमोरी शहरातील पिण्याच्या समस्या असो की घरासमोर असलेल्या नालीची दुर्गंधी असो. अशा विविध अडचणीचा महिलांना सामना करावा लागतो. त्याकरिता चूल व मूल या घुसमटदाबी विचाराच्या बाहेर निघून महिलांनी सुद्धा राजकारणात पुढाकार घेणे अतिशय महत्वाचे व काळाची गरज झाली आहे. आणि आपल्या हक्कासाठी लढणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून समाजहीत व सामाजिक कार्यात महिलांनी पुढाकार घेणे आता महत्वपूर्ण झाले आहे.
सोनूताई अंबादे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून महिला कार्यकर्त्यांच्या विविध समस्याना वाचा फोडत आरमोरी शहरातील विविध प्रभागातील वार्ड प्रमुख महिलांशी संवाद साधून त्यांच्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या. त्यात प्रामुख्याने व महत्वपूर्ण असलेली समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची! आरमोरी शहरात एक दिवसा आड पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावा लागतो. मागील पाच वर्षात आरमोरी नगर परिषद ही अनावश्यक ठिकाणी, जिथे मजबूत व टिकावू नाली बांधकाम आहेत अशाही बांधकामना फोडून सिमेंट नाली, काँक्रीत रस्ते बनवून शासनाच्या निधीचा गैरवापर केलेला आहे. चेंबर युक्त सिमेंट पायली नाली बांधकाम केलेल्या ठिकाणी बऱ्याच महिन्यापासून नालीतील मलबा साफच केला गेला नसल्याने नागरिकांना दुर्गधी चा सामना करावा लागत आहे. स्वछतेच्या नावाखाली कोट्यावधी रक्कम खर्च करून सुद्धा नाली सफाई केली जात नसल्याने व नागरिकांच्या अशा विविध अडचणीच्या मागण्या घेऊन आपण संदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन सुद्धा करणार असल्याचे सोनूताई अंबादे यांनी महिला कार्यकर्त्यांना सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सोनकुसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष ज्योती घुटके, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सदाशिव भांडेकर, युवक शहर अध्यक्ष सचिन लांजेवार, युवती तालुका अध्यक्ष हसीना ठवरे, तालुका अध्यक्ष गोपाल दोनाडकर, तपण मल्लिक, जोगेंद्र सिंग, देवेंद्र सोनकुसरे, योगेश मारभते, मिथुन दुमाने, कौपल्या कांबळे, कमला दुमाने, निलू कांबळे, जीजा अंबादे, माया अंबादे, सरीता कांबळे, जयमाला जांभुळे, ज्योती मेश्राम, रसीका कांबळे, कमल कांबळे, विमल मेश्राम, उजवला दुमाने, मंजुषा खेळकर, पुष्पा दुमाने, रेखा दुमाने, माया खेळकर, शारदा मेश्राम, इंदिरा मेश्राम, बारूबाई ठाकरे, वनिता दुमाने, रेखा भोयर, आरती दुमाने, आशा मेश्राम, निशा शेंडे, वृंदा भांडेकर, कविता खरकाटे, संगीता खरकाटे, मनोरमा डोंगरवार, देविका अंबादे, शालू मेश्राम, शिता सोरते, चित्रकला मेश्राम, मयुरी निमगडे, शकुंतला खरकटे, फुलकन्या मेश्राम, संगीता घाटूरकर, ललिता मेश्राम, अनिता मेश्राम, सुष्मा दुमाने, वनिता दुमाने, शिल्पा लांजेवार, सुनीता लांजेवार, लीला लांजेवार, सुशीला खरकाटे, शिलाबाई आरणे, रसिका शेन्डे, कांता जुवारे मीराबाई गेडाम, दुर्गा चौके, रेवता दुमाने, वंदना दुमाने, मंगला मेश्राम, शोभा मेश्राम, सुष्मा खोब्रागडे, वैष्णवी मेश्राम रोहिणी उईके, तसेंच मोठया संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांचे पक्षात अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा प्रमुख अतुल गण्यारपवार यांनी केला आहे.