तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्थानिक पारबताबाई विद्यालयाने यश

कोरची : देऊळभट्टी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कोरची येथिल पारबतबाई विद्यालयाने यश मिळविले. इयत्ता दहावीची विद्यार्थीनी रुचिता हिवराज पारधी हिने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक, तर प्राथमिक गटात गुंजन परमेश्वर गायकवाड याने तृतिय क्रमांक पटकाविला. माध्यमिक शिक्षक गट शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात सूरज हेमके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल मुख्याध्यापक शालिकराम कराडे, हरिश्चंद्र मडावी, तुळशीराम कराडे, वसंत गुरनुले, महेश चौधरी, जीवन भैसारे, कृष्णमाई खुणे, निर्मला मडावी श्यामराव उंदीरवाडे, मुन्शीलाल अंबादे, कैलाश अंबादे, सुरेश जमकातन, पराग खरवडे यांनी कौतुक केले.