डोंगरगाव येथील शेतकऱ्यांची मागणी
मानवी मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच विद्युत सुद्धा हल्ली मानवी गरजेची असलेली आवश्यक वस्तू बनली आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना शेतात पाणी करण्यासाठी ( कृषिपम्प ) चालविण्यासाठी सुद्धा विद्युत महत्वाचे झाले आहे. परंतू डोंगरगाव येथील शेतातील डीपी वरील ड्युउ ( फ्युज ) गेला असल्याची तक्रार तेथील शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे वारंवार करूनही डोंगरगाव येथील लाईनम्यॅन ( जनमित्र ) यांनी आपल्या निर्देशीत कामाकडे अवलक्ष करून शेतकऱ्याच्या तक्रारीवर कानाडोळा केला असल्याचे डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आरमोरी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी च्या विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन, विषय उजगर केले.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 21/12/2023 च्या सायंकाळी 6:15 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये शेतकऱ्यांनी सांगितले की चार दिवसा अगोदर डोंगरगाव येथील शेत शिवारातील विद्युत मध्ये बिघाड आले होते. कदाचित ड्यूउ ( फ्युज )गेले असल्याचेही शंका शेतकऱ्यांनी वर्तवली. या करिता विद्युत विभागातर्फे डोंगरगाव करिता नेमून दिलिले लाईनमन ( जनमित्र ) यांना गंगाधर खारकाटे यांनी मोबाईल द्वारे संपर्क केला. समंधित फोन कुटुंबातील महिलेनी घेऊन, बोलले असता ते घरी नाही, त्यांनी आल्यावर आम्ही तुम्हाला फोन करा म्हणून सांगतो. असे बोलले. त्यानंतर पुन्हा फोन करून जनमित्र यांना डोंगरगाव शेतशिवरातील विद्युत गेली असल्याचे सांगितले असता सुद्धा डोंगरगाव येथील लाईनमन यांनी सदरील प्रकरणावर कानाडोळा करून अवलक्ष केले. अशा प्रकारची आपण तक्रार देखील म.रा.विद्युत विभाग कंपनी आरमोरी येथील अभियंता यांना केले असल्याचेही पत्रकार परिषद मध्ये सांगितले. त्यामुळे संपूर्ण विषयाची सखोल चौकशी करून त्या दोषी लाईनमन वर कार्यवाही करा अशी मागणी डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद मधून केली आहे
याप्रसंगी निखिल धार्मिक जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष, गंगाधर खरकटे, बाळकृष्ण ढोरे, राजू समृतवार, गोपाल ढोरे, रमेश राऊत, संतोष राऊत, मनोज चौधरी, आदी उपस्थित होते
कोड
मी माझे कर्तव्य प्रामाणिक पणे तसेच नियमावली नुसार पार पाडत असून डोंगरगाव व ठानेगाव परिसरातील ग्राहकांच्या समस्या जाणून रात्री बेरात्री विद्युत दुरुस्ती करून देतो. मुळात म्हणजे त्या दिवशी माझी बी पी वाढली असल्याकारणाने मी आरमोरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आलेला होतो. त्याकरिता घाई गडबडीत मोबाईल घरीच विसरला असल्याने समंधित ग्राहकांची माझ्या बाबतीत गैरसमज झाले असून मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व त्यांना माफी मागतो.
लाईनमन ( जनमित्र )
सुहास पाटील