कर्मवीर विद्यालय वासाळा येथील ९७.३२ % निकाल

 

 

 मार्च / एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या एस.एस. सी.परीक्षेत कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा ( ठाणेगाव ) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील निकाल ९७.३२% लागला असून विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली आहे.

परीक्षेला एकूण ११२ विद्यार्थी बसले असून त्यामध्ये १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यापैकी प्रथम क्रमांक हिताक्षी हरिश्चंद्र राऊत ( ९२.८० % ) द्वितीय क्रमांक भाग्यश्री चंद्रशेखर शेंडे ( ९२.०० % ) तिसरा क्रमांक अनुक्रमे सिमरन नंदकिशोर किरमे ९०.६० ) तृप्ती तुकाराम ढोंगे ( ९०.६०) चौथा क्रमांक श्रुती रामकृष्ण नैताम ( ९०% )तर पाचवा क्रमांक रितू सुधाकर नारनवरे ( ८८ % )मिळविला आहे.

प्राविण्य श्रेणीमध्ये ४६ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीमध्ये ४४ विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीमध्ये १८ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीमध्ये ०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे , सचिव रविंद्रजी जनवार, संचालिका सौ. वर्षा जनवार तसेच सर्व संचालक मंडळ , विद्यालयाचे प्राचार्य श्री.सुनील मेश्राम ,पर्यवेक्षक श्री.प्रमोद दिघोरे , सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.