शिवनी येथे 3 जुलै ला रामदासजी मसराम यांच्यातर्फे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन

 

 

 

आरमोरी :

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा या हेतूने काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवारातर्फे संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये आरोग्य मेळाव्याचे आयोजन सुरू असून या मेळाव्यातील चौथा आरोग्य शिबिर बुधवार, दिनांक 03 जुलै शिवनी येथील राजीव गांधी भवन च्या आवारात सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी, मोफत औषध वाटप, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी तथा मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती रामदास मसराम यांनी दिली.

‘तुमचे आरोग्य संवर्धन हेच आमचे धोरण’ या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरात शुअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जामठा नागपूर तथा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

शिबिरात हृदयरोग, हाडांचे आजार, सामान्य रोगांची तपासणी, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत औषध वाटप, मधुमेह तपासणी, ई.सी.जी तपासणी करण्यात येणार आहे.

अधिक माहितीकरिता सागर वाढई, जावेद शेख, अमोल मिसार आदींशी संपर्क साधावा, असेही मसराम म्हणाले. शिवणी (सायगाव) परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी पं. स. सभापती परसराम टिकले, आरमोरी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस माजी उपसभापती नितीन राऊत, सागर वाढई,जावेद शेख, किन्हाळा ग्रा. पं. सदस्य प्रमोद पत्रे यांच्यातर्फे करण्यात आले .

तसेच आज पासून सुरू झालेल्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवसापासून सर्व जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करून शिक्षणाबद्दलचा प्रेम व आपुलकी भावना अजूनही आपल्यात जिवंत आहे तसेच शिक्षक, शिक्षिकाना व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक क्षेत्राच्या शुभेच्छा दिले