श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी , येथे डॉक्टर डे साजर करण्यात आला…

 

 

डॉक्टरांना देवाच्या बरोबरीचा दर्जा देण्यात आला आहे कारण तोच तो माणूस आहे जो आपल्याला सर्वात लहान रोगापासून तर सर्वात दुर्गम आजारापर्यंत बरे करण्यास मदत करतो .  

              डॉक्टरांनीच आपले शरीर पुन्हा निरोगी बनवले आहे , आजच्या धावपडीच्या जगात अनेक रोग पसरले आहेत काही निदान करणे शक्य आहे आणि काही नाहीत परंतु तरीही डॉक्टर आपल्याला निरोगी बनविण्यासाठी नेहमी तयार असतो. आज १ जुलै , आजच्या दिवशी म्हणजेच डॉक्टरांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. आजच्या दिवशी आपण सर्वांनी डॉक्टरांचे आभार मानावे , त्यांच्या कौशल्याचे आणि समर्पणाचे कौतुक करावे . पुढील काळात वैद्यकीय क्षेत्रात अधिकाधिक प्रगती होण्यासाठी डॉक्टरांना आपले पूर्ण सहकार्य देऊया असे प्रतिपादन श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स वाकडीचे अध्यक्ष तथा श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरीचे संचालक सुधाकर साळवे यांनी केले . प्रास्ताविक करिष्मा हांडे यांनी केले . संचालन निषिद्ध करंबे या विद्याथी नि केले तर आभार प्रियांका मडावी हिने केले .यशश्वीतेसाठी प्राचार्य पूनम नारनवरे, संगम मेश्राम , भूषण ठाकर , पल्लवी कोथळकर , चंदू दुमाने , मोनाली सेडमेक , ऋषिकेश कोहळे , अलका मारभते , स्नेहा बोरकर यांनी परिश्रम घेतले.