शिवणी येथील आरोग्य मेळाव्यात तब्बल 1356 रुग्णांनी केली आरोग्य तपासणी

 

 

शिवणी: आरमोरी तालुक्यातील शिवणी येथे काँग्रेसचे नेते रामदास मसराम व मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 1356 रुग्णांनी तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये शिवणी, सायगाव, वघाळा या भागात वास्तव्यात असलेले बहुतांश लोक शेतकरी प्रवर्गातील असुन सुद्धा शेतात मशागतीचे दिवस सुरू असताना या गोरगरिब लोकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर, प्रयत्नशील असलेले शेतकरी आंदोलनाचे नेते रामदास मसराम यांनी शिवणी येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप, नेत्र उपचार, मोफत चष्मे वाटप व सामान्य रोगांची तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात 784 रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 290 रुग्णांची सामान्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली, 107 रुग्णाची बिएमडी मशिन द्वारे तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला. हृदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करून 10 रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन तसेच 18 मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन केले व 45 रुग्णाची इसिजी, तर 15 रुग्ण मुत्र खड्याचे तर 23 रुग्ण स्त्रीरोग तपासण्यात आले . याप्रसंगी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते यांचेसह 11 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिराचे आयोजक रामदास मसराम काँग्रेस नेते यांचे सह उदघाटक – श्री डॉ महेश कॉपुलवार, अध्यक्ष श्री पुरषोतम दोनाडकर सरपंच शिवणी प्रमुख अतिथी – श्री परसरामजि टिकले, श्री सुरेश जी ढोरे,श्रि केशवराव ठाकरे कासवी,श्री रामदास दोनाडकर वघाडा,श्री धनराज दोनाडकर वघाडा, अण्णाजी लिंगायत, ऋषीजी मातेरे , बळीरामजी ठाकरे, विनायक पत्रे, पुरषोत्तम माकडे, गौरीताई बुल्ले, जोतीताई बांडे, प्रभाबाई राऊत, प्रणिता बगमारे , प्रेमिला मेश्राम सदाशिव मेश्राम ,मनोहर राऊत , नानाजी बगमारे उपस्थित होते. आरोग्य शिबिराला नागपूरच्या सुप्रसिद्ध असलेल्या श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर व त्यांचे कर्मचारी देसाईगंजच्या ग्रामिण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली. यशस्वीतेसाठी सागर वाढई, स्वप्नील मिसार, गौरव शिलार, शैलेश येलगंधवार, कमलेश बारस्कर, शेखर कुथे, उमाकांत दोनाडकर,चरण दोनाडकर,रामदास बाडे,पुरुषोत्तम वेध्य,चागदेव राऊत,गजानन बाडे,विलास पत्रे,रमेश चोधरी,रामदेव बगमारे, आकाश पेटकुले, रोशन कवासे, दुषांत वाडगुरेयांचेसह युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.