०१ ऑगस्ट २०२४ पासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानात आदिवासी पेसा १३ जिल्ह्यातील १७ संवर्गाच्या उमेदवारांचे पेसा पदभरतीमध्ये उमेदवारांची कायमस्वरूपी आणि तात्काळ पद भरती करण्यात यावी, तसेच कुठल्याही प्रकारे कंत्राटी किंवा तात्पुरती स्वरूपाची भरती करण्यात येऊ नये, यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. तरी अद्याप पर्यंत तरी शासनाने याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही आमच्या आदिवासी मुलांना न्याय मिळालेला नाही.
तरी आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उपोषणकर्त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि संविधानिक आहेत तरी
आपल्या स्तरावरून आपल्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून तातडीने निर्णय घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या
पूर्ण करण्यात याव्यात उपोषण करणारी मुले-मुली आदिवासी समाजाचे आहेत म्हणून विलंब केला जात असेल तर
आदिवासी विद्यार्थ्यांचा आणि आदिवासी समाजाचा आंदोलनांचा इतिहास तपासून पहावा. शासनाने याकडे गांभिर्याने
लक्ष घालावे तसेच शासनाने योग्य ती भूमिका घेऊन आमच्या आदिवासी मुला-मुलींना कायमस्वरूपी आणि तात्काळ
1618 नियुक्त्या देण्यात याव्यात. राज्यातील परिस्थिती अस्थिर होऊ नये म्हणून सदरील निवेदन सादर करून आम्ही सुचित १०५ करीत आहोत.
त्याचप्रमाणे आदिवासी पेसा १३ जिल्ह्यातील १७ संवर्गाच्या उमेदवारांना पुढील दोन-तीन दिवसांमध्ये कायमस्वरूपी आणि तात्काळ नियुक्ती देण्यात याव्यात यासाठी शासनाने तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. जर का आमच्या आदिवासी उमेदवारांच्या मागण्या येत्या २९ ऑगस्ट २०२४ च्या आत शासनाने पूर्ण केल्या नाहीत तर आमच्या स्तरावरून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या माध्यमातून एक प्रचंड राज्यव्यापी जन आंदोलन केले जाईल.
यावेळी उपस्थित कोरेगाव ग्रामपंचायत सरपंच बालाजी गेडाम, समीर कोरेटी कथा समस्त कोरेगाव वासिय