जागतिक महिला दिनी महिलांनी केला गॅस दरवाढ आणि महागाई चा निषेध.

आरमोरी…. भारतीय महिला फेडरेशन आरमोरी,पतंजली योग ग्रुप, बचत गटाच्या महिलांनी विवेकानंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला . उद्घटनप्रसंगी प्रा.सौ.सोनाली कापकर यांनी प्रत्येक महिलेने आता आपले सौरक्षण करण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. अध्यक्ष सौ.वसुधा कोपुलवार यांनी महिला संघटित झाल्यास काहीही करू शकतात असे सांगितले. प्रमूख मार्गदर्शक डॉ. शिलू चीमुरकर यांनी स्त्रियांचे आजार आणि त्याची काळजी कशी घ्यायची यावर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून गौरी जौजलकर,सौ.सिंधू कापकर नगरसेविका आरमोरी,सफाई कामगार मीनल बनसोड, राजश्री राऊत यांनी योग रोज करावा,योगाचे फायदे सांगितले. प्रास्ताविक का. मिनाक्षी सेलोकर महीला फेडरेशन यांनी वाढती महागाई आणि गॅस दरवाढ यामुळे महिलांचे बजेट बिघडले आहे, त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा निषेध व्यक्त केला तसेच महिलांनी एकत्र होऊन आंदोलन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले. संचलन सौ.रोशनी झिमटे यांनी केले तर आभार सौ.उज्वला चाहांदे यांनी केले.महीला सफाई कामगार आणि सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका चा सत्कार करण्यात आले.तसेच आरोग्य विभागातर्फे रक्तगट, सिकलसेल, थायरॉईड होगलबिन,काविळ , तपासणी करण्यात आली त्याकरिता श्री आशिक वासनिक,श्री चौधरी ,गौरी यांनी सहकार्य केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.अश्विनी मेश्राम,सपना,शीतल,अलका,ज्योती खेवले,सिंधू कोरडे, श्रद्धा,राणी, सरिता,युगा,आणि सर्व महिला फेडरेशन आणि योग ग्रुप , बचत गटाच्या सर्व महिलांनी सहकार्य केले.