सुशिक्षित युवकाची नक्षलवाद्याकडून हत्या

: *बिग ब्रेकिंग

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

साईनाथ नरोटे (26) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावाचा रहिवासी होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

साईनाथ हा गडचिरोली येथे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता, होळीच्या सणानिमित्त हा तरुण आपल्या स्वगावी आला होता. मात्र पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी युवकाची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.