गडचिरोली जिल्ह्यात खनिज व वन उपजावर आधारीत प्रक्रिया उद्योग सूरू करा. माजी जिल्हा परीषद सभापती वेणूताई ढवगाये यांची मागणी.

आरमोरी … गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिज व वनसंपदा आहे. मात्र त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यात आले नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजगारापासुन वंचीत आहे. जिल्ह्यातील कच्चा खनिज व वनसंपदेच्या आधारावर दुसऱ्या जिल्ह्यातील उद्योग चालतात. त्यामुळें खनीज व वनावर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारणीस चालना द्यावी अशी मागणी माजी जिल्हा परीषद महीला व बालकल्याण सभापती वेणु ताई ढवगाये यानी केली आहे.

गडचिरोली जिल्हा हा खनिज व वनसंपदेचे नटलेला जिल्हा असुनही उद्योग विरहित जिल्हा आहे. हे या जिल्ह्याचे दुर्भाग्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड, कोन्सरी व इतर अनेक भागात खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत्. येथील कच्चा दगड उत्खनन करुण जिल्ह्याबाहेर वाहतूक केला जातो. त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यात एका विशिष्ठ कंपनीचा फायदा होत आहे. मात्र यामुळे जिल्ह्याचे मागासलेपण वाढत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर खनीज संपत्ती असूनही जिल्हयात प्रक्रिया कारखाना उघडण्यात आला नाहीं. त्यामुळें जिल्ह्याला मिळणारा महसूल तर बुडत आहे शिवाय जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित तरुण रोजगार पासुन वंचीत आहेत. जिल्हयात एकही मोठा उद्योग नसल्याने जिल्ह्यातील तरुण रोजगारासाठी इतरत्र भटकत आहे.l
गडचिरोली जिल्हयात जंगल मोठ्यप्रमाणावर आहे. जंगलात बांबु मोह, तेंदुपत्ता, डिंक चार व इतर अनेक वन उपज आहे. जिल्ह्यातील लोकांचा तेंदू व्यवसाय करतात येथील तेंदु पत्ता दुसऱ्या जिल्हयात निर्यात करुण त्यापासून बिडी तयार केली जाते. येथील बांबु दुसऱ्या ठिकाणी पेपर मिल ला जाते. मोहा डिंक व इतर वन उपजावर आधारीत प्रक्रिया उद्योग जिल्हयात उभारणी केल्यास या जिल्ह्याचे मागासले पण दुर झाल्याशिवाय राहणार नाही. पण तसे होत नसल्याने जिल्ह्यातील तरुणाच्या हाताला काम मिळत नाहीं. बेरोजगारी वाढत चालली आहे. जिल्ह्याचे मागासलेपण वाढत चालले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन या जिल्ह्याच्या विकाससाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावे. व खनिज व वाना वर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु करुन या जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परीषद महीला व बाल कल्याण सभापती वेणु ताई ढव गाये याणी केली आहे.