श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरी येथे ‘आंतरराष्ट्रिय परिचारिका दिन’ साजरा

 

 

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी नर्सिंगच्या आधुनिक पद्धतींचा पाया रचला… सुधाकर साळवे….

 

आरमोरी…. श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरी येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला ‘आमच्या नर्सेस… आमचे भविष्य.. काळजी घेणारी आर्थिक शक्ती’ अशी यावर्षीच्या जागतिक परिचारिका दिनाची थीम ठरवण्यात आली त्यानुसार परिचारिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री साई इंन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडीकल सायन्स, वाकडीचे अध्यक्ष तथा श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीचे संचालक सुधाकर साळवे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली धात्रक, सामाजिक कार्यकर्ते संजय कापकर, पत्रकार महेंद्र रामटेके, महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. पूनम नारनवरे, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी भूषण ठकार उपस्थित होते.

 

यावेळी मार्गदर्शन करताना सुधाकर साळवे यांनी फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्या श्रीमंत कुटुंबातून आल्या होत्या.तरी सुध्दा त्यांनी आपल जीवन रुग्णसेवेला अर्पण केले . त्यांनी लंडन मध्ये मृत्युदर ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला होता. फ्लोरेन्स नाइटिंगेल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत, रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णांची काळजी घेत.कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकांच्या देखरेखीखाली असते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून रुग्णाची परिचारिका अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंदी ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असे आहे त्यांच्या शिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले.

 

डॉ. सोनाली थात्रक यानी हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण दाखल झाला तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपेक्षा तिथल्या नर्सेस जास्त लक्षात राहतात. कारण, डॉक्टरापेक्षा जास्त काळजी त्या घेतात .एखाद्या पेशंटला बर करण्यात जसे डॉक्टर महत्वाचे असतात. तसेच, जीव लावून काळजी घेणाऱ्या नर्सेसही असतात असेही त्या म्हणाल्या.

 

जागतिक परिचारिका दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनी, रांगोळीचे देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात सहभागी सर्व विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. करिष्मा हांडे यांनी केले, संचालन कु सेलिना लकड़ा, दीपाली करनकर, संजना अत्यालगड़े व योगिता बगमारे या विद्यार्थिनींनी केले तर आभार कु. वृषाली तोंडरे या विद्यार्थिनींनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या कु. पूनम नारनवरे, संगम मेश्राम, पल्लवी कोथळकर, चंदू दुमाने, करिष्मा हांडे, मोनाली सडमेक, भूषण ठकार, अलका मारबते, स्नेहा बोरकर, फुलबांचे यांनी परिश्रम घेतले.