कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० %

 

 

फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये झालेल्या एच.एस. सी.परीक्षेत कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा ( ठाणेगाव ) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील निकाल १०० % लागला असून महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली आहे.

परीक्षेला एकूण ३३ विद्यार्थी बसले असून त्यामध्ये प्रथम क्रमांक चेतराम पुरुषोत्तम लाकडे ( ६९.५० % ) द्वितीय क्रमांक योगेश रविंद्र राऊत ( ६८.३३ % ) तिसरा क्रमांक वैभव कालिदास बावणे ( ६६.०० %) तर चौथा क्रमांक रोहिणी नानाजी नारनवरे ( ६५.६७ % ) मिळविला आहे.

प्रथम श्रेणीमध्ये एकूण १४ विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीमध्ये १७ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीमध्ये ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे , सचिव रविंद्रजी जनवार, संचालिका सौ. वर्षा जनवार तसेच सर्व संचालक मंडळ , महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सुनील मेश्राम ,पर्यवेक्षक श्री.प्रमोद दिघोरे , प्रा.नानाजी रामटेके , प्रा.मनोज आलबनकार ,प्रा.विनोद कुनघाडकर तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.