आरमोरी येथे दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरी च्या वतीने मतदार जनजागृती अभियान संपन्न

 

लोकशाही शासनव्यवस्था हे भारतीय प्रजासत्ताकाचे वैशिष्ट्य आहे. खरे तर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. लोकशाहीत मतदान हे सर्वात महत्त्वपूर्ण तत्त्व आहे. हे मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मोठ्या प्रमाणत व्हावे यासाठी  मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ,ब्रम्हपुरी या NGO च्या वतीने मतदार जनजागृती अभियान बाजार चौक आरमोरी येथे राबविण्यात आला.यापूर्वी अश्याच स्वरूपाचा कार्यक्रम ब्रम्हपुरीच्या येथे राबवण्यात आला होता.

या अभियानाच्या निमित्ताने मतदान,लोकशाही,संविधान यांच्या संबंधाने वेगवेगळ्या पोस्टरची प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या पोस्टर वर मातदानासंबंधी अनेक बाबी प्रकर्षाने मांडण्यात आल्या होत्या.  प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे यासाठी पत्रके सुध्दा या वेळी वितरीत करून जनजागृती करण्यात आली.

आठवडी बाजाराच्या निमीत्ताने आरमोरी येथे खेड्यापाड्यातून आलेल्या अनेक लोकांनी या पोस्टर प्रदर्शनीला भेट देऊन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाची स्तुती करत संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभियानाच्या निमित्ताने संस्था अध्यक्ष डॉ स्निग्धा कांबळे यांनी अभियानाला भेट देणाऱ्यांना  संविधानाचे ,लोकशाहीचे,मतदानाचे महत्व समजावून सांगितले व प्रत्येकाला मतदान करा असे आवाहन केले. संस्थेच्या वतीने  मतदार जनजागृती कार्यक्रम दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात राबवण्यात आल्याचा आनंद डॉ स्निग्धा कांबळे यांनी व्यक्त केला.

               या अभियानाच्या निमित्ताने कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभुर्ने, सचिव सतीश डांगे, संजय  बींजवे,मंगेश नंदेश्वर, वसुधा रामटेके, हे संस्था पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते