आरमोरी….
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारात आयोजित अभिवादन रॅलीत सहभागी अनुयायासाठी समता युवा सामाजिक संघटनांच्या वतीने रविवारी अन्नदान करण्यात आले.
आरमोरी शहरात मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते.. त्यानिमितताने भिमजयंती रॅली शहरातून काढण्यात येते. यात सहभागी अनुयायांसाठी तथागत बुध्द विहार परिसरात समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने भोजनदान व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.हजारो अनुयायांनी भोजांनदाणाच्या कार्यक्रम चा लाभ घेतला.
यावेळी समता युवा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक प्रा. अमरदिप मेश्राम, महेन्द्र रामटेके, ॲड अमित टेंभुर्णे, संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे, उपाध्यक्ष प्रविण रहाटे, मंगेश पाटील सचिव अनुप रामटेके, सुगत बांबोळे, विकास बारसागडे, सौ. भारती मेश्राम, वनमाला सुखदेवे , मंगला गणवीर सह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.