रब्बी हंगामातील पिके हाती आली तरी खरीप हंगामातील धान्याची उचल अद्याप केली नाही

 

कोरची.

चार – पाच महीन्याआधी आदिवासी महामंडळाच्या वतीने खरीप हंगामातील धान्याची खरेदी केली आहे. परंतु हे धान्य वेळेवर उचल केले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील धान्य खरेदी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान्य खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही.

खरीप हंगामातील धान्य खरेदी केल्यानंतर लगेच हे धान्य भरडाई करण्यासाठी व्यापाऱ्यांना / मील धारकांना दिला जात होता. एक- दोन महिन्यात धान्याची पुर्णतः उचल होत होती. परंतु या वर्षी धान्य खरेदीला चार ते पाच महीन्याचा कालावधी लोटला तरीही धान्याची उचल करण्यात आली नाही.

दुसरीकडे रब्बी हंगामातील बऱ्याच शेतकऱ्यांचे धान्य जमा झाले आहेत. परंतु धान्य खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे हे धान्य घरीच पडून आहेत. घरात धान्य ठेवण्यासाठी योग्य सोय उपलब्ध नाही. त्यामुळे हे धान्य उंदीर घुशीं मोठ्या प्रमाणात फस्त करीत असल्याने शेतऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.